घरताज्या घडामोडीजबरदस्त! बँक लस घेणाऱ्या व्यक्तींच्या Fixed Deposit वर देतेय जास्त व्याज; जाणून...

जबरदस्त! बँक लस घेणाऱ्या व्यक्तींच्या Fixed Deposit वर देतेय जास्त व्याज; जाणून घ्या अधिक माहिती

Subscribe

देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीमेवर अधिक भर दिला जात आहे. आता देशात २३ कोटींहून अधिक जणांचे लसीकरण पार पडले आहे. पण अजून लसीकरण वाढवण्याच्या उद्देशाने काही सरकारी बँकांनी Fixed Deposit (FD) जमावर जास्त व्याज देत आहे. परंतु ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. ज्यांनी कोरोना लसीचा एक डोस घेतला आहे, अशा अर्जदारांना ९९९ दिवसांचा एफडीवर ३० बेसिस पॉइंट्स म्हणजे ०.३० टक्के जास्त व्याज दर देण्यात येईल, असे यूको बँकने म्हटले आहे.

बँकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही लसीकरण मोहीम वाढवण्यासाठी एक छोटे पाऊल उचलत आहे. मर्यादित कालावधीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत UCOVAXI-999 ऑफर देत आहे.

- Advertisement -

अलीकडेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India)ने लसीकरण करणाऱ्यांसाठी लागू कार्ड दरावर २५ बेसिस पॉइंट्स अतिरिक्त व्याज दरासोबत इम्यून इंडिया डिपॉझिट स्कीम सुरू केली होती. नव्या ऑफरची मुदत १,१११ दिवसांची असल्याची बँकने सांगितले होते.

दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांवरील वयोगटातील सर्व नागरिकांसाठी केंद्र लस खरेदी करणार आणि राज्यांना मोफत देणार आहे असे सांगितले. २१ जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवशी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे केंद्राकडून मोफत लसीकरण होईल. मोदी म्हणाले की, लसीबाबत अफवा पसरू नका आणि लोकांच्या जीवाशी खेळू नका. केंद्र सरकार या आर्थिक वर्षात अँटी-कोरोना लसीवर ४५० अब्ज रुपये खर्च करू शकते. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या रक्कमेपेक्षा ही रक्कम सुमारे १०० अब्ज रुपये जास्त असेल.

- Advertisement -

हेही वाचा – Pm kisan Yojana: खुशखबर! मोदी सरकार शेतकऱ्यांना वर्षाला देतेय ४२ हजार, जाणून घ्या कसे?


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -