घरअर्थजगतIncome Tax Return: पहिल्यांदा ITR दाखल करताय? तर या गोष्टींची घ्या काळजी

Income Tax Return: पहिल्यांदा ITR दाखल करताय? तर या गोष्टींची घ्या काळजी

Subscribe

इनकम टॅक्स भरण्याची तारिख ३१ जुलै २०२१ वरुन ३० सप्टेंबर २०२१ करण्यात आली.

देशात कोरोना महामारीमुळे सरकारने इनकम टॅक्स भरण्याची तारिख ३१ जुलै २०२१ वरुन ३० सप्टेंबर २०२१ करण्यात आली. इनकम टॅक्स कायद्यानुसार, आर्थिक वर्ष २०२०-२१ चे इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारिख ३१जुलै २०२१ आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीची सुरुवात करताना इनकम टॅक्सच्या बाबतीत अनेक अडचणी येतात. टॅक्सबर इनकम, २६AS, फॉर्म १६,टीडीएस आणि टॅक्स सेविंग इनवेस्टमेंट यांसारखे शब्द ऐकून अनेक जण गोंधळून जातात. त्यामुळे पहिल्यांदा ITR दाखल करताना काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती करुन अत्यंत महत्त्वाचे आहे. (Income Tax Return: First time filing ITR? So take care of these things)

आर्थिक वर्षांच्या शेवटी मागील वर्षीच्या उत्पन्नाची गणना करण्यासाठी तीन ते चार महिने देण्यात येतात. हा वेळे आपल्या योग्य कर उत्पन्नाची गणना करण्यासाठी आणि टॅक्स भरण्यासाठी देण्यात येतो. जर एखाद्या व्यक्तीचा निव्वळ कर २.५ लाखाहून अधिक असेल तर त्या व्यक्तिला इनकम रिटर्न दाखल करणे गरजेचे आहे. निव्वळ कर डिड्क्शन कमी करुन मिळवता येते. इनकम टॅक्सवर अनेक डिडक्शन असतात. तुम्ही जितके डिडक्शन वापरणार तितकाच टॅक्स कमी होतो.

- Advertisement -

ITRचे फायदे तोटे

जर तुम्ही भविष्यात गाडीसाठी,घरासाठी किंवा वयक्तिक कारणासाठी लोन घेणार असाल तर ITR फायलिंगची रिसिट तुमच्यासाठी महत्त्वाचे कागदपत्र ठरेल. बँकेत लोन घेताना पहिल्यांदा मागील तीन वर्षातील ITR ची रिसिट मागितली जातात. ITRमुळे लवकरात लवकर लोन पास होण्यास मदत होते.

जर तुम्ही वीजासाठी अप्लाय करणार असाल तर त्यासाठीही मागील वर्षाची ITR रिसिट कामी येते. अनेक दूतावास ITRची सिरीट मागतात. जर तुम्ही शेअर किंवा म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्यात तोटा झाला असेल तर तो तोटा कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी ITR फाइल महत्त्वाची असते.

- Advertisement -

जर तुमची एका आर्थिक वर्षाची कमाई दीढ लाखांहून कमी असेल तरीही तुम्ही वरील गोष्टींचा लाभ घेण्यासाठी ITR फाइल करु शकता. ITR फाइन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर असे केले नाही जर दहा हजारांपर्यंत दंड लागू शकतो.


हेही वाचा – सरकारचा मोठा निर्णय, १५ हजारांनी स्वस्त होणार इलेक्ट्रीक स्कुटर

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -