घरताज्या घडामोडीसमाजात विष पसरवण बंद करा, योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर निशाणा

समाजात विष पसरवण बंद करा, योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर निशाणा

Subscribe

केवळ सत्तेच्या लालसेपोटी मानवतेचा अपमान करत आहात - योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशमधील गाजियाबादमध्ये एका वृद्ध मुस्लिम व्यक्तीला जबरदस्ती श्रीराम चे नारे लावण्यास सांगितले होते. नारे न लगावल्यामुळे जबर मारहाण करण्यात आली असल्याची घटना उघडकीस आली होती. यावर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला होता. यावर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर देत राहुल गांधींना खडेबोल सुनावले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी सल्ला देत राहुल गांधी यांना समाजात विष पसरवणं बंद करा असे सांगितले आहे. सत्तेच्या लालसेपोटी जनतेला अपमानित करण्यात येत असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

वृद्ध मुस्लिम व्यक्तीला जबरदस्थी धार्मिक घोषणा करण्यासा भाग पाडले जात आहे. तसेच त्याने घोषणा न केल्यामुळे जबर मारहाण केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. या वृद्धाच्या डोक्याला बंदूक लावून भीती दाखवली गेली असल्याचे म्हटलं जात आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मला असं वाटलं नव्हते की, श्री रामाचे भक्त असं काही करु शकतात. अशी क्ररता मानवतेपासून कोस दूर आहे. समाज आणि धर्मासाठी हे लज्जास्पद असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रभू रामाची पहिली शिकवण खरं बोला अशी आहे. जे कधी तुमच्या संपुर्ण आयुष्यात बोलला नाही. पोलिसांद्वारे माहिती देण्यात आली असूनही टीका करुन समाजामध्ये विष पसरवताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. केवळ सत्तेच्या लालसेपोटी मानवतेचा अपमान करत आहात. उत्तर प्रदेशच्या लोकांना अपमानित करणं आणि बदनाम करणं सोडा आशा आशयाचे ट्विट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे सांगण्यात आले आहे की, एका मुस्लिम व्यक्तीला चार अज्ञात तरुणांनी पकडले आहे. एका खोलीत या वृद्धाला डांबून ठेवण्यात आलं असून तरुण त्याला जबरदस्ती करुन “जय श्रीराम” असा घोषणा करण्यास भाग पडत मारहाण आणि दाढी कापल्याचा आरोप या व्यक्तीनं केला आहे. गाजियाबाद पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली. ही घटना ५ जून रोजी घडली होती. दोन दिवसानंतर ७ जूनला पोलिसांना माहिती देण्यात आली. गाजियाबादचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अमित पाठक यांनी म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशमधील बुदलंशहचे रहिवासी अब्दुल समद यांनी तक्रारीत व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आरोप केले नाहीत.

अमित पाठक यांनी सांगितले की, या प्रकरणात परवेश गुर्जर नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाने पिडीत समद यांच्याकडून ताविद बनवून घेतले होते. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, समदला चौकशीसाठी वारंवार बोलावण्यात आले परंतु ते चौकशीसाठी उपस्थित राहले नाहीत. सोमवारीही त्यांना बोलवण्यात आले होते परंतु तरिही ते उपस्थित राहले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -