घरट्रेंडिंगMcDonald च्या नाईट शिफ्टला कंटाळला, I Hate this Job म्हणत ड्राइव थ्रूवरच...

McDonald च्या नाईट शिफ्टला कंटाळला, I Hate this Job म्हणत ड्राइव थ्रूवरच सोडला राजीनामा

Subscribe

मॅकडॉनल्ड्स (McDonald) कंपनी बाहेरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. परंतु या फोटोंमध्ये मॅकडॉनल्ड्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जे काही लिहिले आहे ते वाचून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल. या फोटोंमुळे आता मॅकडॉनल्ड्स कंपनी आणि त्यातील कर्मचाऱ्यांमधील वाद समोर आला आहे.

मॅकडॉनल्ड्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम करताना येणारा अधिकचा ताण, नाईट शिफ्टमध्ये एकटे काम करताना येणाऱ्या अडचणींना कंटाळून जॉब सोडला. दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांनी जॉब सोडताना ड्राईव्ह थ्रूवर एक पेपर चिटकवला आहे. त्या पेपरवर कर्मचाऱ्यांनी ‘I Hate this Job’आता सगळ बंद आहे, आम्ही जॉब सोडला कारण आम्हाला जॉबचा तिरस्कार वाटतोय.’ एका ट्विटर युजर्सने सोमवारी आपल्या स्थानिक मॅकडॉनल्ड्स आउटलेटचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला. .@GreatApeDad नावाच्या ट्विटर हँडलवरून हा फोटो शेअर करण्यात आला होता. यानंतर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर हा फोटो तुफान व्हायरल होऊ लागला.

- Advertisement -

मॅकडॉनल्ड्स कर्मचाऱ्यांच्या जॉब रिझायनचा फोटो शेअर करणाऱ्या युजर्सने आणखी एक ट्वीट पोस्ट करत लिहिले की, त्याने मॅकडॉनल्ड्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली. यातून असे समोर आले की, नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या नोकरीला कंटाळून जॉब सोडला आहे. सध्या या फोटोला ट्विटरवर २ लाखाहून अधिक लाईक्स आणि २० हजारांहून अधिक रिट्वीट मिळाले आहेत. तर अनेक य़ुजर्स कमेंट्सच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांप्रती दया दाखवत आहेत.

- Advertisement -

युजर्सच्या प्रतिक्रिया

ट्वीटरवर सध्या अनेक युजर्स मॅकडॉनल्ड्स कर्मचाऱ्यांच्या बाजूने मत व्यक्त करत आहेत तर काही युजर्स रात्री एकट्याने काम कारावे लागत असल्याने जॉब सोडून देणे हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हणत आहेत. यावर एका युजर्सने ट्वीट करत म्हटले की, ‘वर्करचा जॉब सोडण्याचा निर्णय योग्य होता. तर दुसऱ्या एका युजर्सने लिहिले की, ‘मॅकडॉनल्ड्समध्ये मी १६ वर्षे काम केले हा माझा पहिला जॉब होता. आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण जॉब होता. मला आता आनंद होत आहे जे काही झाले ते पाहून.’


भारत बायोटेकची Covaxin लवकरचं WHO च्या यादीत होणार समाविष्ठ, २३ जूनला पार पडणार बैठक

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -