घरदेश-विदेशकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे 'या' देशात कहर; सर्वाधिक रूग्णांची नोंद

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे ‘या’ देशात कहर; सर्वाधिक रूग्णांची नोंद

Subscribe

गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशापरिस्थितीत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे देशाच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे. या नव्या व्हेरिएंटचा कहर न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक झाला असल्याचे सांगितले जात आहे. न्यूयॉर्क शहर आरोग्य विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, न्यूयॉर्क शहरातील कोविड -१९ च्या तपासणीतील ६ टक्क्यांपेक्षा जास्त रूग्णांमध्ये ‘डेल्टा’ संसर्गाची पुष्टी झाली आहे. न्यूयॉर्क विभागाच्या आरोग्य विभागाने नुकत्याच दिलेल्या माहितीत असे म्हटले की, ५ जून रोजी अखेरच्या आठवड्यात १०५ कोरोना विषाणूंच्या विविध प्रकारच्या चाचण्यांमध्ये ६.७ टक्के डेल्टा (बी.१ ६१७.२) आहेत. त्यामुळे १०५ प्रकरणांपैकी ६.७ टक्के रूग्ण हे डेल्टा व्हेरिएंटचे असल्याचे सांगितले जात आहे.

न्यूयॉर्कच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बी. १.१.७ (अल्फा) आणि बी .१.५२६ (योटा) हे शहरातील सर्वात वेगवान पद्धतीने पसरलेले व्हेरिएंट आहेत. यासह अमेरिका आणि इतर देशांमध्ये वेगाने पसरत असलेल्या पी.१ (गामा) आणि बी १.६१७.२ (डेल्टा) यांसारख्या व्हेरिएंटचेही परीक्षण सुरू असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले आहे. विभागानुसार शहरातील कोविड -१९ च्या १०५ नवीन रूग्णांपैकी ३६.२ टक्के म्हणजेच अल्फा या स्वरूपाची आहेत, तर योटा स्वरूपाची रूग्णं ८.८ टक्के म्हणजे ५ रूग्ण आणि गॅमा स्वरूपाची रूग्ण टक्के १७.१ म्हणजेच १८ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यानुसार डेल्टा स्वरूपाची ७ रूग्ण झाली आहेत आणि आकडेवारीनुसार डेल्टा स्वरूपाची ५.६ टक्के रूग्णांची नोंद गेल्या चार आठवड्यात करण्यात आली आहे.

- Advertisement -

गुरुवारी न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड -१९ चा संसर्ग होणारे ६८ रुग्णांना दररोज शहरातील रुग्णालयात दाखल केले जात असून सध्या तेथील संसर्गाचा दर ८.३३ टक्के इतका असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाव्हायरसचे आणखी एक स्वरूप ओळखले गेले. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात असे म्हटले की, लैम्बडा नावाच्या कोविड -१९ चा एक नवीन प्रकार ओळखला गेला आहे, जो आतापर्यंत २९ देशांमध्ये पसरला आहे. डब्ल्यूएचओने पुढे असेही म्हटले की, हा नवीन प्रकार सर्वप्रथम ऑगस्ट २०२० मध्ये पेरूमध्ये आढळला, त्यानंतर तो लॅटिन अमेरिका, अर्जेंटिना आणि चिलीसह २९ देशांमध्ये दाखल झाला आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -