घरमहाराष्ट्रनाशिककाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साधणार शेतकर्‍यांशी संवाद

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साधणार शेतकर्‍यांशी संवाद

Subscribe

जिल्हाध्यक्ष डॉ.शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली आढाव बैठक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रथमच जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे देखील येत्या शनिवारी (दि.26) नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. येथे शेतकर्‍यांशी संवाद साधणार असून त्यानंतर काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांची बैठक बोलवण्यात आली आहे. या दौर्‍यापूर्वी जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनी काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक घेतली.

जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक मंगळवारी (दि.22) घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे, आमदार हिरामण खोसकर माजी मंत्री शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, अ‍ॅड. अनिल आहेर, निर्मला खर्डे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी रमेश कहांडोळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, दिंगबर गिते, जिल्हा बँकेचे माजी संचालक संदिप गुळवे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, शैलेश पवार, सुमित्रा बहिरम, युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चौथवे, किसान सेल जिल्हाध्यक्ष संपत वक्ते, अल्पसंख्याक अध्यक्ष रौफ कोकणी, यशवंत पाटील, शांताराम राठोड, रमेश पवार, प्रमोद धोंगडे, राजेंद्र मोगल, सुनिता पालवे, उमाकांत गवळी, शकील शेख, अंबादास ढिकले, शिवाजी कासव, अशोक शेंडगे, प्रकाश खळे, मनोहर अहिरे, मधुकर शेलार, समाधान पाटील, विशाल जाधव, संजय जाधव, भिमराव जेजुरी, प्रकाश पिंगळे, रतन जाधव, रामदास धांडे, विनायक सांगळे उपस्थित होते. सूत्रसंचलन ज्ञानेश्वर गायकवाड यांनी, तर आभार प्रकाश अडसरे यांनी मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -