घरमहाराष्ट्रनाशिकआडगावला वाहनांची तोडफोड प्रकरणी दोघांना अटक

आडगावला वाहनांची तोडफोड प्रकरणी दोघांना अटक

Subscribe

ही घटना सोमवारी (दि.२२) सायंकाळी बिडीकामगारनगर परिसरात घडली.

जुन्या भांडणाची कुरापत काढून रिक्षातून आलेल्या दोघांनी तीन टेम्पो व कारवर दगडफेक करून काचांची तोडफोड करत दहशत पसरवल्याची घटना सोमवारी (दि.२२) सायंकाळी बिडीकामगारनगर परिसरात घडली. याप्रकरणी एकनाथ मोहिते यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल डोलनार (वय २४) व कृष्णा बिडगर (५३, रा. बिडीकामगारनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, जुन्या भांडणाची कुरापत काढून बिडीकामगारनगर येथे आलेल्या डोलनार व बिडगर या संशयितांनी मोहिते यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत मारहाण करून तीन टेम्पो व एका कारवर दगडफेक करून तोडफोड केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -