घरमहाराष्ट्रनाशिकतौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी १० कोटी मंजूर

तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी १० कोटी मंजूर

Subscribe

या वादळामुळे ८१२ हेक्टर वरील शेतीपिकांचे नुकसान

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी ९ कोटी ३७ लाखांची तर नाशिक विभागास १० कोटी ४७ लाखांची मदत शासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यात या वादळामुळे ८१२ हेक्टर वरील शेतीपिकांचे नुकसान झाले. यात फळबागांना सर्वाधिक फटका बसला असून ७९८ हेक्टरवरील आंब्याचं नुकसान झाले.

जिल्ह्यात १६ ते १८ मे या तीन दिवसात तौक्ते वादळाचा परिणाम दिसून आला. सात तालुक्यांना या वादळाचा फटका बसला असला तरी सर्वाधिक फटका पेठ, सुरगाणा तालुक्याला बसला. सुरगाणा तालुक्यातील १३० गावे बाधित झाली असून २५४१ शेतकर्‍यांचे ५८१ हेक्टरवरील तर पेठ तालुक्यातील ९३ गावे बाधित झाली असून १४८० शेतकर्‍यांचे २०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे देवळा, दिंडोरी, नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील शेतकर्‍यांना या वादळाचा फटका बसला. या सात तालुक्यांतील २४२ गावे बाधित झाली असून एकूण ४०९६ शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान फळपिकांचे झाले असून यात आंबा ७९८.३० हे., डाळींब २ हे., पेरू १.३८ हे. असे एकूण ८०१.६८ हेक्टर तर बागायत क्षेत्रावरील ११ हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. कृषी विभागाने तातडीने पंचनामे पूर्ण करत शासनाला अहवाल सादर केला आहे. शासनाने संपूर्ण राज्यासाठी १७० कोटी ७२ लाखांचा मदत निधी मंजूर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -