घरताज्या घडामोडीराज्यात कोरोनामुक्त गावात ८वी ते ९वीचे वर्ग होणार सुरू

राज्यात कोरोनामुक्त गावात ८वी ते ९वीचे वर्ग होणार सुरू

Subscribe

कोरोनामुक्त गावांनी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावताना पालकांशी चर्चा करावी

राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. (Classes 8th to 9th will be held in Corona free village in Maharashtra)  राज्य शासनाने याबाबत काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावाने शासनाने जारी केलेल्या निर्णयाप्रमाणे पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे. कोरोनामुक्त गावांनी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावताना  पालकांशी एकदा चर्चा करावी त्यानंतर याबाबत ठराव करावा. कोरोनामुक्त गावातील शाळ सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. कोरोनामुक्त गावात ८ वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जाणून घ्या.

कोरोनामुक्त गावात ८ वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

 

- Advertisement -
  • कोरोनामुक्त गावातील ८वी ते १०वीचे वर्ग सुरु करण्याआधी पालकांशी चर्चा करून ग्रामपंचायतीला ठरावा आणावा लागणार आहे.
  • विद्यार्थ्यांना टप्प्या टप्प्याने शाळेत बोलण्यात येणार.
  • अदला बदलीच्या दिवशी सकाळी आणि दुपारी महत्त्वाच्या विषयावार सर्वाधिक भर देण्यात यावा.
  • एका बाकावर एक विद्यार्थी तर दोन बाकांमध्ये सहा फूटांचे अंतर ठेवावे लागणार.
  • एक वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थ्यांना बसण्यास परवानगी.
  • कोरोना संदर्भात कोणतीही लक्षणे आढल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठण्यात येईल. त्यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य असेल.
  • संबंधित शिक्षकांची व्यवस्था त्याच गावात करावी. शिक्षकांनी सार्वजनिक वाहतूकीचा वापर टाळावा.
  • शाळेचा परिसर स्वच्छा आणि आरोग्यदायी ठेवणे. हात धुण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
  • एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास तिथल्या स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी हलवावे. त्यानंतर संपूर्ण शाळेचे निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य असेल.
  • शाळेत मुलांप्रमाणे शिक्षकांना मास्क लावणे अनिवार्य.

हेही वाचा – हेच ते भाजपचे १२ निलंबित आमदार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -