घरअर्थजगतRBI ची देशातील १४ बँकांवर मोठी कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावला कोट्यावधींचा...

RBI ची देशातील १४ बँकांवर मोठी कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावला कोट्यावधींचा दंड

Subscribe

एसबीआयपासून बंधन बँकेसह १४ बँकांवर दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातील १४ बड्या बँकांवर मोठी कारवाई केली आहे. RBI च्या मार्गदर्शक सूचना आणि तरतुदींचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत RBI ने १४ बँकांवर कोट्यावधी रुपयांपर्यंत दंड ठोठावला आहे. यामुळे देशातील बँकांसमोरील अडचणी अधिक वाढल्या आहेत. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचाही कारवाई करण्यात आलेल्या बँकांमध्ये समावेश आहे.

‘या’ नियमांचे केले उल्लंघन

केंद्रीय बँक अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांसाठी काही तरतुदी आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यामध्ये नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांना देण्यात येणारे कर्ज (NBFC), एनबीएफसीला देण्यात येणारे बँक फायनान्स, कर्ज आणि प्रगती – वैधानिक आणि इतर निर्बंध तसेच सर्व बँकांमध्ये मोठ्या कॉमन एक्स्पोजरसाठी सेंट्रल रिपॉझिटरी तयार करणे’ या तरतुदींचा समावेश आहे.

- Advertisement -

त्याशिवाय ‘मोठ्या कर्जांच्या सेंट्रल रिपोजिटरीला सुचना देणारे परिपत्रक, छोट्या बँकिंग फायनान्स बँकाच्या संचालनाशी संबंधित मार्गदर्शक सूचना आणि बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या कलम -१९ (२) आणि कलम -२० (१) चे उल्लंघन केल्याने या बँकांवर हा दंड आकारण्यात आला आहे.

‘या’ १४ बँकांना दंड ठोठावण्यात आला

RBI ने ठोठावलेल्या १४ बँकांमध्ये बंधन बँक लिमिटेड, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट सुईसी एजी, इंडियन बँक, इंडसइंड बँक. कर्नाटक बँक, करूर वैश्य बँक, पंजाब अँड सिंध बँक, साउथ इंडियन बँक, भारतीय स्टेट बँक, जम्मू आणि काश्मीर बँक, आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचा समावेश आहे. आरबीआयने यापूर्वी या बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु या बँकांकडून असमाधानी उत्तर मिळाल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे. या सर्व बँकांवर ५० लाख रुपयांपासून ते २ कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावला आला आहे.

- Advertisement -

बँक ऑफ बडोदावर सर्वाधिक दंड

बँक ऑफ बडोदावर आरबीआयने सर्वाधिक २ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. त्याचवेळी एसबीआयवर सर्वात कमी दंड म्हणजे ५० लाख रुपये दंड ठोठावला आहे. इतर सर्व बँकांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -