घरमनोरंजनजगातील सर्वोत्कृष्ट व्हेज बिरयाणीची मेजवानी दिल्याबद्दल सोनू सुदने मानले मंत्र्याचे आभार

जगातील सर्वोत्कृष्ट व्हेज बिरयाणीची मेजवानी दिल्याबद्दल सोनू सुदने मानले मंत्र्याचे आभार

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने गरजवंतांची मदत करत आज संपूर्ण देशवासियाची मनं जिंकून घेतली आहे. कुणी त्याला देवाची मनतंय तर कुणी देव मानतं पुजा करतंय. गेल्या वर्षापासून त्याने न थकता न चिडता अविरतपणे लोकांची मदत केली. आज खूप लोक त्याचावर प्रेम करतात. आदर करतात. कोरोना काळात तर त्याने सिद्ध केले की तो रिअर लाईफ हिरो आहे. सोनू सूदचा सोशल मीडियावर देखील मोठी चाहता वर्ग आहे. तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या सोनू सूदला देशासह जगभरातील युजर्स फॉलो करतात. सोनू प्रत्येक नव्या नव्या गोष्टी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत असतो. अलीकडेच सोनू सूद तेलंगणाच्या आयटी आणि उद्योग मंत्री यांना भेटण्यासाठी गेला होता. या भेटीदरम्यानचे काही फोटो सोनू सूदने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.

- Advertisement -

हे फोटो शेअर करत सोनू सूदने “जगातील सर्वोत्कृष्ट व्हेज बिर्याणी” दिल्याबद्दल तेलंगणाच्या मंत्र्याचे आभार मानले आहेत. मंत्र्यांच्या भेटीपूर्वी सोनू सूदने मंत्र्यांना “हैदराबादची बिर्याणी खाण्यासाठी तयार ठेवा” सांगितले होते. परंतु सोनू सूद शाकाहारी असल्याने त्याचे बिर्याणीबद्दल बोलणे हास्यास्पद असल्याचे म्हणत अनेकांनी त्याला ट्रोल केले. तर अनेकांनी हैदराबादी बिर्याणी ही मांसाहारी पदार्थ असल्याची आठवण करून देत कमेंट्सचा पूर आणला. या ट्रोलिगंला उत्तर देत आता सोनू सूदने वेज बिर्याणीबद्दल तेलंगणाच्या मंत्र्याचे आभार मानले आहेत.

नुकतीच सोनू सूदने प्रगती भवनात तेलंगणाच्या आयटी आणि उद्योग मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी दुपारच्या जेवणासाठी शाकाहारी बिर्याणीचा बेत ठेवण्यात आला होता.

- Advertisement -

या भेटीनंतर सोनू सूद ट्विटरवर मंत्र्यांचे आभार मानत लिहिले की, “जगातील सर्वोत्तम वेज बिरयाणी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.” आता मी म्हणू शकतो, ‘तुम्ही तेलंगणामधील सर्वोत्कृष्ट पाहुणचार करणारे आहात’. मंत्र्यांच्या ट्वीटला उत्तर देताना सूदने त्यांचे विशेष पद्धतीने आभार मानले.

गरीबांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारा सोनू सूद गरिबांचा ‘मसिहा’ बनला आहे. आजपर्यंत त्याने अनेक गरजू लोकांची मदत केली. यात तेलंगणच्या मंत्र्यांनीही भेटीदरम्यान सोनू सूदच्य कोरोना काळातील कामाचे कौतुक केले. या भेटीचे काही फोटो सोनू सूदने शेअर केली आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -