घरमनोरंजनआशा भोसले गाडीत 'या' गाण्याचा सराव करत असताना ड्रायवर म्हणाला, रुग्णालयात जायचं...

आशा भोसले गाडीत ‘या’ गाण्याचा सराव करत असताना ड्रायवर म्हणाला, रुग्णालयात जायचं का?

Subscribe

बर्मन साहेबांना सांगितले मी हे गाण चार ते पाच दिवस गाण्याचा प्रयत्न करेन. तसेच मी काही दिवस कारमध्ये मुख्य धुनचा सराव करत होते.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो इंडियन आयडल 12 (Indian Idol 12)मध्ये दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) उपस्थित राहणार आहेत. याचदरम्यान, आशा भोसले यांनी गायलेल्या अनेक हिट गाण्यांचा अनुभव तसेच अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अशातच 1966 मध्ये रिलीज झालेला ‘तीसरी मंजिल’ सिनेमाबद्धल आशा भोसले यांनी काही रंजक माहिती सांगितली आहे. इंडियन आयडल शोमध्ये आशा भोसले यांची अनेक गाणी स्पर्धकांनी गायली. यापैकी शोमधील स्पर्धक निहाल टॉरो याने ‘आजा आजा मैं हूं प्यार तेरा’ या गाण्याचे सादरीकरण केले असता आशाजी आठवणीत गुंग झाल्या त्यांच्या डोळ्यासमोर जुना काळ  उभा राहीला त्या वेळी त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते की, हे गाण गाऊ की नको? तेव्हा आशाजी यांना त्यांच्या बहिण दिग्गज गाणकोकीळा लता मंगेशकर यांनी सल्ला दिला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle)

- Advertisement -

जुन्या घटनेचा उलगडा करत आशा भोसले म्हणाल्या,”हे गाण (आजा आजा मैं हूं प्यार तेरा) गाणे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते. एक दिवस आरडी बर्मन साहेब घरी आले होते, बाजा घेतला आणि मला गाण गाण्याची विनंती करू लागले. जेव्हा मी ‘ओ आ जा, आह आह’ प्ले केल्यावर ऐकलं तेव्हा मी हैराण झाली होती मला वाटले मी हे करु शकत नाही. तसेच मी बर्मन साहेबांना सांगितले मी  गाण चार ते पाच दिवस गाण्याचा प्रयत्न करेन. यानंतर मी काही दिवस कारमध्ये मुख्य धुनचा सराव करत होते. एक दिवस माझा ड्रायवर चिंता व्यक्त करत मला विचारल तुम्हांला रुण्नालयात जायचे आहे का? तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतोय का ? त्याला वाटले माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला वारंवार श्वास घेण्यास त्रास होत आहे. खरचं हा खूप हास्यास्पद आणि मजेदार क्षण होता.” आशा भोसले यांनी गायलेलं ‘आजा आजा मैं हूं प्यार तेरा’ सुपरहिट ठरले होते. तसेच त्यांच्यासोबत मोहम्मद रफी यांनी सुद्धा गाण्यात सहभाग घेतला होता.



हे हि वाचा – ‘Big Boss’ सहा आठवड्याआधीच दिसणार वूटवर !

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -