घरटेक-वेकWhatsApp Privacy Policy च्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती, व्हॉट्स अँपची HCला माहिती

WhatsApp Privacy Policy च्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती, व्हॉट्स अँपची HCला माहिती

Subscribe

जोवर डेटा प्रोटेक्शन बिल लागू होत नाही तोवर ही प्रायव्हसी पॉलिसी स्वेच्छिक राहील

व्हॉट्स अँपच्या नवीन पॉलिसीवर दिल्ली हायकोर्टात शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी व्हॉट्स अँपने महत्त्वाची माहिती दिल्ली हायकोर्टाला दिली. व्हॉट्स अँपने त्यांची प्रायव्हेसी पॉलिसी स्वेच्छिक असल्याचे म्हटले आहे. व्हॉट्स अँपने आपली प्रायव्हसी पॉलिसी आपल्या स्वेच्छेने थांबवल्याने व्हॉट्स अँप प्रायव्हसी पॉलिसीच्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती मिळाली आहे. जोवर डेटा प्रोटेक्शन बिल लागू होत नाही तोवर ही प्रायव्हसी पॉलिसी स्वेच्छिक राहील असे व्हॉट्स अँपने म्हटले आहे. त्यामुळे आता व्हॉट्स अँपची ही नवीन प्रायव्हसी पॉलिसी अँक्सेप्ट न केलेल्या युझर्सची चिंता काही वेळासाठी दूर झाली आहे. पॉलिसी अँक्सेप्ट न केलेल्या युझर्सना देखील व्हॉट्स अँप सुविधा वापरता येणार आहे. ( new privacy policy on hold till data protection law comes into whatsapp tells delhi hc)

आम्ही आमच्या इच्छेने प्रायव्हसी पॉलिसी स्थगित केली आहे. डेटा प्रोटेक्शन बिल लागू होत नाही तोवर युझर्सना प्रायव्हसी पॉलिसी अँक्सेप्ट करण्यासाठी कोणीही जबरदस्ती करणार नाही असे व्हॉट्स अँपने दिल्ली हायकोर्टात सांगितले आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणी कोणतीही रेग्युलेटर बॉडी नाही त्यामुळे आम्ही वाट पाहू आणि सरकारच्या नियमांनुसार त्यात बदल करु. त्यामुळे काही काळ ही पॉलिसी लागू करणार नसल्याचे व्हॉट्स अँपने म्हटले आहे.

- Advertisement -

दिल्ली उच्च न्यायालयात व्हॉट्स अँपच्या याचिकेवर ऑनलाईन पद्धतीने सुनावणी करण्यात आली. यावेळी वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी व्हॉट्स अँपने इलेक्ट्रॉनिक्श आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नोटीशीला प्रतिसाद दिल्याचे सांगितले. व्हॉट्स अँपच्या नव्या प्रायव्हसी पॉसिली विरोधात CCi च्या तपासात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक; देशातील ऑक्सिजन साठ्याचा आढावा घेणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -