घरक्राइमअनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

Subscribe

बहिणीकडे गेल्याने नितीनला राग अनावर झाल्याने त्याने संतापाच्या भरात आपल्या पत्नीच्या हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.

पुण्यातील हडपसर विभागात माणुसकीला काळीमा फासणारी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने चक्क आपल्या पत्नीवर अनैतिक संबधाच्या संशयातून रागाच्या भरात चाकूने वार करुन तिला गंभीर जखमी करत पत्नीची निघृण हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. सदर घटना भोसरीतील चक्रहास वसाहतीत असून दोघंही पती-पत्नी या विभगात गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास होते. अंजली नितीन निकम असं मृत महिलेचं नाव असून तिचे वय 22 वर्ष  असल्याचे कळतेय. तसेच नितीन बापू निकम असं 33 वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून अंजलीचा पती नितीन हा तिच्या चारीत्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात नेहमी वाद-विवाद होत असे.

काही दिवसांपुर्वीच अंजलीचं आपल्या पतीसोबत जोरदार भांडण झालं होतं. यामुळे अंजली रोजच्या जाचाला कंटाळून हडपसर गाडीतळ येथे राहणाऱ्या बहणीकडे काही दिवसांपासून राहत होती. आपली पत्नी बहिणीकडे गेल्याने नितीनला राग अनावर झाल्याने त्याने संतापाच्या भरात आपल्या पत्नीच्या हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. संपुर्ण प्लॅनिंग करुन नितीन शनिवारी दुपारच्या सुमारास पत्नीला घेण्यासाठी मेव्हुणीच्या घरी गेला. पत्नीला घेऊन तो, आपल्या मुलाला घेण्यासाठी सासूच्या घराकडे निघाला. सर्व काही आपण ठरवल्यप्रमाणे होत आहे. हे पाहील्यानंतर नितीनंने पत्नीला घरी घेऊन जात असताना, गाडीतळ बंटर शाळेच्या आवारात निर्जन ठिकाणी गाडी थांबवली आणि आपल्या पत्नीवर चाकूनं वार करण्यास सुरूवात केली. यानंतर अंजलीला गंभीर दुखापत झाली याचदम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच हडपसर गाडीतळ याठिकाणी राहणाऱ्या अंजलीच्या बहीणीने (वैशाली अर्जुन गायकवाड) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आसल्याचे कळतेय तसेच पुढिल तपास सूरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -


हे हि वाचा – बलात्कार पीडितेने तडजोड करण्यास दिला नकार; आरोपीच्या पत्नीने जिवंत पेटवले



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -