घरCORONA UPDATEcorona third wave : कोरोनाची तिसरी लाट रोखणे शक्य आहे का? जाणून...

corona third wave : कोरोनाची तिसरी लाट रोखणे शक्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Subscribe

देशात नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सतत घट होत आहे. अशातच तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेचा वेग वाढवणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनाही लसींच्या दोन डोसमधील अंतर लक्षात ठेवत लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र लसींचा तुटवडा आणि लसीकरण प्रक्रियेतील गोंधळ पाहता, लसीकरणाचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागणीपेक्षा लसींचा पुरवठा कमी

यामुळे देशात कोरोनाची तिसरी रोखणे खरचं शक्य होईल का असा यक्ष प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उपस्थित राहिला आहे. यावर आता पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितानुसार, मुंबई महानगरपालिका लसीकरण मोहिम वेगाने सुरु ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. मात्र मागणीपेक्षा लसींचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे मुंबईत लसीकरणासाठी जितक्या नोंदणी होत आहेत. तितक्या लसी पुरवण्यात अडचणी येत आहेत. मुंबई पालिका एका दिवसात १ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करु शकते. मात्र केंद्राकडून तितक्या लसी उपलब्ध झाल्या पाहिजेत. यात गेली दोन दिवस ठप्प झालेली लसीकरण मोहिम सोमवारपासून पुन्हा सुरु होत आहे. मात्र लसीकरण प्रक्रिया पुन्हा ठप्प होऊ नये यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. असेही सांगितले जात आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने लसीकरणासंबंधीत गठीत केलेल्या समितीची दिल्ली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यांना मागणीनुसार लसींचा पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन समितीने राज्यांना दिले. मात्र प्रत्यक्षात लसींचा पुरवठा सुरळीत होईल का असा प्रश्न प्रकर्षाने समोर येत आहे.

लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे

यात महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. कारण कोरोना विषाणू सतत आपले रुप बदलत आहे. यात डेल्टा, लाम्बडा असे कोरोनाचे नवे रुप नागरिकांसाठी घातक ठरत आहेत. त्यामुळे योग्य वेळेत नागरिकांना लसींचे दोन्ही डोस वेळेवर मिळणे महत्त्वाचे आहे. कारण हा विषाणू वेळनुसार संधिसाधत आपले हातपाय पसरत आहे. ही बाब विसरता असे मत संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ.सीतेश नायर यांना व्यक्त केले.

- Advertisement -

राज्यात जितकी लोकसंख्या आहेत त्याप्रमाणात लसी उपलब्ध व्हाव्यात. यात मुंबईतील लोकसंख्या सर्वाधिक असल्याने मुंबईलाही लसींचा संख्या वाढवून द्यावी अशी मागणी पालिकेने केली आहे. मात्र केंद्राकडून अद्याप ही मागणी पूर्ण झालेली नाही.

गर्भवती महिलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात

गर्भवती महिलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र पालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना गर्भवती महिलांचे लसीकरण करण्याचे प्रशिक्षण पुर्ण झालेले नाही, त्यामुळे आजपासून खासगी रुग्णालयात गर्भवतींचे लसीकरण होणे सुरु झाल आहे, त्यामुळे गुरुवारपासून पालिकेच्या रुग्णालयात लसीकरण सुरु होईल. मात्र पालिकेने निश्चित केलेल्या लसीकरण केंद्रांवरच लस घेता येणार आहे.

कागदपत्रे नसलेल्यांनाही मिळणार लस

कोणतेही कागदपत्रे किंव अधिकृत पुरावा नसलेल्या व्यक्तींनाही लस मिळणार आहे. यासाठी प्रभागात अशी किती व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. याचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कोणीही लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी हा प्रयत्न आहे. असे पालिकेने स्पष्ट केले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -