घरमहाराष्ट्रनाशिकभरधाव गाडीच्या बोनेटवर दिसला साप, तरीही केला तीन किलोमीटर प्रवास

भरधाव गाडीच्या बोनेटवर दिसला साप, तरीही केला तीन किलोमीटर प्रवास

Subscribe

सर्पमित्राला बोलावून केली सापाची सुटका

सापाचे नाव घेतले तरी अनेकांना धडकी भरते. त्यामुळे साप समोर आल्यावर काय होते, हे विचारायला नको. अशाच एका प्रसंगाला नाशिकच्या रत्नदीप सिसोदीया यांनी तोंड दिले.

मध्यप्रदेशातून नाशिकच्या दिशेने येत असताना त्यांना बोनेटवर अचानक एक मोठा साप दिसला. हा साप थेट वायपरजवळून काचेवर डोलू लागला.अशातही प्रसंगावधान राखत सिसोदीया यांनी जराही न डगमगता गाडी पुढे 3 किलोमीटर चालवत शिरपूर साखर कारखान्याजवळची हायवे पोलिस चौकी गाठली. हा सर्व थरार त्यांच्या कुटुंबाने मोबाईलमध्ये कैद केला. पोलिसांच्या मदतीने त्यांनी एका सर्व्हिस स्टेशनच्या रॅम्पवर गाडी नेली आणि सर्पमित्राला बोलावून सापाची सुटका केली. त्यानंतर या सापाला जंगलात सोडून देण्यात आलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -