दोन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेल महागले (Petrol-Diesel Price) आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर ३५ पैसे प्रति लीटर आणि डिझेल दर १५ पैसे प्रति लीटर वाढवले आहे. यामुळे आता राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीने (Petrol Price) १०१ रुपयांचा आकडा पार केला असून १०१.५४ रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे. तर डिझेल किंमत (Diesel Price) वाढून ८९.८७ रुपये प्रति लीटर झाले आहे.
जाणून घ्या इतर शहरामधील पेट्रोल-डिझेलचे दर
शहर पेट्रोल दर डिझेल दर
दिल्ली १०१.५४ ८९.८७
मुंबई १०७.५४ ९७.४५
चेन्नई १०१.७७ ९३.६३
कोलकाता १०१.७४ ९३.०२
बंगळूरू १०४.९४ ९५.२६
भोपाल १०९.८९ ९८.६७
चंडीगढ ९७.६४ ८९.५०
रांची ९६.४५ ९४.८४
लखनऊ ९८.६३ ९०.२६
पटना १०३.९१ ९५.५१
मागील दोन दिवसात तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. १ मेपासून आतापर्यंत पेट्रोल १०.३५ रुपयांनी महागले आहे. दिल्लीत १ मेला पेट्रोलची किंमत ९०.४० रुपये प्रति लीटर होती आणि आता १०१.५४वर पोहोचली आहे. गेल्या ७४ दिवसात पेट्रोल ११.१४ रुपये प्रति लीटरने वाढले आहे. तसेच डिझेलच्या किंमतीत गेल्या दोन महिन्यात ९.१४ रुपये प्रति लीटरने वाढ झाली आहे. १ मेला राजधानीत डिझेलची किंमत ८०.७३ रुपये प्रति लीटर होती, आता वाढून ८९.८७ रुपये प्रति लीटरने वाढले आहे.
पेट्रोल-डिझेलचे अपडेट प्रत्येक दिवसाला दिल्या जातात. एका मॅसेजच्या माध्यमातून आपल्या शहरात पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊन शकता. यासाठी इंडियन ऑईल (IOCL)च्या ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९वर पाठवावा लागेल. आपल्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी https://iocl.com/ या लिंकवर क्लिक करा.