घरदेश-विदेशत्या Apple कर्मचाऱ्यावर पोलिसानेच झाडली गोळी; खून की स्वसंरक्षण?

त्या Apple कर्मचाऱ्यावर पोलिसानेच झाडली गोळी; खून की स्वसंरक्षण?

Subscribe

लखनऊमध्ये एका आयफोन मॅनेजरचा पोलिसाच्या गोळीबारात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी . पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जगप्रसिद्ध अॅपल फोनच्या रिजनल मॅनेजरचा उत्तर प्रदेशमध्ये एका पोलिसाच्या गोळीबारात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आयफोनचा लॉन्चिग कार्यक्रम झाल्यानंतर मॅनेजर विवेक तिवारी घरी जात होते. त्याच दरम्यान त्यांच्या गाडीवर गोळी झाडली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आपण सांगूनही तिवारी यांनी गाडी थांबवली नाही आणि आपल्या अंगावर गाडी घातली म्हणून आपण स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली असल्याचे चौधरी याने आता सांगितले आहे.

नेमके काय घडले?

उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरात शुक्रवारी अॅपल कंपनीचा लॉन्चिग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम पार पडल्यानंतर आयफोनचे मॅनेजर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरी परतत होते. दरम्यान, रस्त्यात त्यांना पोलिसांनी कार थांबवण्याचा इशारा केला. मात्र तिवारी यांनी कार थांबवली नाही त्यामुळे कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी यांनी त्यांच्यावर गोळी झाडली. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

कॉन्स्टेबल यांनी का झाडली गोळी

लखनऊमध्ये आयफोनच्या लॉन्चिगनंतर मॅनेजर रात्री घरी निघाले होते. त्यांना गाडी थांबवण्याचा इशारा दिला मात्र त्यांनी गाडी न थांबवली नाही. तर त्यांनी गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण स्वत:च्या बचावासाठी त्यांच्यावर गोळी झाडल्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -