घरताज्या घडामोडीआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार, अमित देशमुख यांची माहिती

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार, अमित देशमुख यांची माहिती

Subscribe

कान्स चित्रपट महोत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात सहभाग घेणे शक्य झाले नाही.

कान्स चित्रपट महोत्सवाबरोबरच गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या काही वर्षांपासून सर्वोत्तम मराठी सिनेमे सांस्कृतिक कार्य विभागाकडून पाठविण्यात येत आहे. येत्या सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या बर्लिन, व्हेनिस, टोरँटो, सनडान्स, न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी येथे सांगितले. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची १५७ वी बैठक आज अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत मराठी सिनेमाला जागतिक बाजारपेठे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने चर्चा झाली.

मराठी चित्रपटांना व्यापक जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला जावा यासाठी सर्वोत्तम मराठी सिनेमे येणाऱ्या काळात वेगवेगळया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सामील करण्यात येणार आहेत. यावर्षी कान्स चित्रपट महोत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात सहभाग घेणे शक्य झाले नाही. मात्र आगामी काळात नोव्हेंबर २०२१ मध्ये गोव्यात होणाऱ्या ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या फिल्मबाजार अंतर्गत सर्वोत्तम १० मराठी चित्रपट पाठविण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले. याशिवाय महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

- Advertisement -

कान्स २०२१ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘कडूगोड’ आणि ‘मी वसंतराव’ या दोन चित्रपटांची निवड समिती सदस्यांनी केली आहे. आज झालेल्या बैठकीत या दोन्ही चित्रपटांच्या निवडीबद्दल संबंधित संस्थेचे निर्माते,दिग्दर्शक, कलाकार यांचे अभिनंदन अमित देशमुख यांनी केले.

यावेळी चित्रनगरी परिसरातील चित्रीकरण स्थळे आणि कलागारे यांचे भाडेतत्वावर आरक्षण देताना मेकअपरुम साहित्य पॅकेजनुसार निर्मिती संस्थांना उपलब्ध करुन देणे, कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी नवीन उपक्रम राबविणे, महामंडळस्तरावर महामंडळाचे सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत योजना राबविणे आदी मुद्दयांवरही चर्चा झाली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -