घरताज्या घडामोडीMaharashtra Rain : पूरात शेकडो नागरिक अडकले, हजारो घरांचे नुकसान

Maharashtra Rain : पूरात शेकडो नागरिक अडकले, हजारो घरांचे नुकसान

Subscribe

तालुक्यातील सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांनी रौद्ररूप धारण केले.

रायगड, चिपळूण, महाड आदी ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेकडो नागरिक पूरात अडकलेले आहेत. महाड परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराला महाप्रलयाचा तडाखा बसला आहे. तालुक्यातील सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी, औद्योगिक परिसरात प्रवेश केला. संपूर्ण शहरात शिरलेल्या पुराच्या पाण्याने सागराचे रूप धारण केले.महाड तालुक्यात गेली चोवीस तासात मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे तालुक्यातील सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांनी रौद्ररूप धारण केले.

खळखळून वाहणाऱ्या या नद्यांनी महाड शहरात पहाटेच्या सुमारास प्रवेश केला. शहरातील मुख्य बाजारपेठ, गांधारी नाका, शेंडाव नाका, रोहिदास नगर, छ. शिवाजी चौक, काकरतळे, नवेनगर, कुंभारआळी, आदी परिसरात पाणी शिरले होते. त्यामुळे अनेक बैठ्या घरात नागरिक अडकून पडले होते. पाण्याचे वेग प्रचंड असल्याने इमारतीच्या तळमजला आणि त्यावरील पहिल्या मजल्यापर्यंत पाण्याने शिरकाव केला. शहरातील काकरतळे, खारकांड मोहल्ला, रोहिदास नगर, तांबडभुवन, तांबट आळी, नवेनगर, पंचशील नगर, भीमनगर, सरेकर आळी, या भागात शिरलेल्या पाण्याने जवळपास १४ फुटाची मजल मारली. यामुळे दुसऱ्या मजल्यावर देखील नागरिकांमध्ये घबराट पसरली.

- Advertisement -

पूरामुळे अनेक घरांचे नुकसान

शहरातील विविध भागात बैठ्या घरांचे प्रमाण मोठे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी येईल याची कोणाला कल्पनाही नव्हती. महाडला पूर हा नवीन नाही मात्र २०२१ मध्ये आलेल्या पुराने आतापर्यंत चा रेकॉर्ड मोडला आहे. हजारो घरांचे या पुरामुळे संसार उध्दवस्त झाले आहेत. घरातील अन्न धान्यासह, आतापर्यंत कमावलेली संपत्ती देखील वाहून गेली आहे.

एन. डी. आर. एफ. बनले देवदूत

महाड मधील विविध भागात बैठ्या घरांमध्ये अडकलेल्या नागरिकाना काढण्यासाठी शेजारील नागरिक टाहो फोडत होते. एकीकडे सर्वच मोबाईल कंपन्यांच्या सेवा ठप्प झाल्या तर दिवसभर वीज नसल्याने मोबाईल बंद पडल्याने संपर्क साधने कठीण होत होते. जेमतेम संपर्क होताच एन.डी.आर.एफ. चे पथक अंधारात पाण्याच्या प्रचंड वेगात देखील आपली सेवा बजावत होते. अनेकांना त्यांनी सुखरूप बाहेर काढले. यामुळे रात्रीच्या भयाण अंधारात एन.डी.आर.एफ.चे पथक देवदूतच ठरले.

- Advertisement -

हेही वाचा – ही केवळ अतिवृष्टी नाही तर अनपेक्षित संकट आहे – मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -