घरमहाराष्ट्रMaharashtra Landslide : दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत

Maharashtra Landslide : दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत

Subscribe

जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केली. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोक संवेदानाही मुख्यमंत्री शठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले.

- Advertisement -

या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

महाड येथील बचाव कार्याचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झाली आहे. मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.

- Advertisement -

बचाव कार्य आणो रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरु करावे,अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पाणी ओसरले आहे पण महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाडमधील परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची खबरदारी घेण्यास ठाकरे यांनी सांगितले. बाटू लोणेरे येथे एक वैद्यकीय पथक सज्ज असून त्यांच्याकडे रुग्णवाहिका आणि इतर सामुग्री आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -