घररायगडरोह्यामध्ये बांधकामे करणाऱ्यांची मनमानी

रोह्यामध्ये बांधकामे करणाऱ्यांची मनमानी

Subscribe

मानवी अतिक्रमणामुळे पावसाळ्यात या भागात पाणी तुंबण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागतं आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे रोह्यामधील परिसरातील वरसे, भुवनेश्वर या भागाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या वारंवार निर्माण होत आहे. मात्र मनमानीपणे बांधकामे करण्यात येत आहेत. ही समस्या उद्भवत असल्याने या बांधकामांची त्वरित चौकशी करण्याचे आदेश रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. हा परिसर शहराला खेटून असल्याने या भागात छोट्या-मोठ्या अनेक गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी झाली आहे. मात्र नगररचना आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या अटी-शर्थीनुसार संबंधित विकासक बांधकाम करीत नसल्यामुळे समस्या उद्भवत आहेत. ग्रामपंचायतीला सर्वत्र लक्ष देत यावर नियंत्रण आणणे शक्य नाही. येथील नागरिकांना यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबल्यामुळे मनःस्ताप सहन करावा लागत आहे. तटकरे यांनी बुधवारी या परिसरातील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी प्रांत डॉ. यशवंत माने, तहसीलदार कविता जाधव, गट विकास अधिकारी अनिकेत पाटील, पंडित राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, सरपंच नरेश पाटील, उपसरपंच मनोहर सुर्वे, सदस्य रामा म्हात्रे, अमित मोहिते, गणेश शिवलकर, राकेश गुरव, शांतीशील तांबे उपस्थित होते.

नियमांचे उल्लंघन करीत बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई

आता नव्याने सुरू असलेल्या सर्व बांधकामाच्या परवान्यांची खातरजमा करीत जेथे नियमांचे उल्लंघन होत असेल ती बांधकामे त्वरीत थांबवा, या सोबतच ही समस्या कायम दूर करण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सर्वच गृहनिर्माण बांधकामांची नगररचना विभाग, विकासक, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक यांची एकत्रितपणे बैठक घेत सर्व बांधकाम परवान्यांची चौकशी करा आणि ज्यांनी नियमांचे उल्लंघन करीत बांधकामे केली असतील त्यांच्यावर सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने कारवाई करा, असे तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बजावले आहे.

- Advertisement -

विकासकांच्या मनमानीमुळे समस्या जैसे थे !

कळसगिरी आणि लगतच्या डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा पाटबंधारे खात्याचा कालवा नादुरुस्त आणि अतिक्रमित झाला आहे. त्यामुळे सर्व पाणी भुवनेश्वर, वरसे या भागातून कुंडलिकेला मिळत आहे. या मानवी अतिक्रमणामुळे पावसाळ्यात या भागात पाणी तुंबण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते. खासदार सुनील तटकरे यांनी गेल्या वर्षी रोहे- कोलाड रस्त्याचे रूंदीकरण होत असताना या भागातील पाण्याचा योग्य निचरा व्हावा यादृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी मोठ्या मोऱ्यांची उभारणी करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार त्यांची उभारणी झाली आहे. मात्र विकासकांच्या मनमानीमुळे समस्या जैसे थे आहे.


हेही वाचा – Tokyo Olympics : ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी नरेंद्र मोदींनी दिल्या जपानच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -