घररायगडखोपोली पोलिसांची मुकुंद नगरमधील महिलांशी अरेरावी

खोपोली पोलिसांची मुकुंद नगरमधील महिलांशी अरेरावी

Subscribe

अडीच दशके नगर परिषदेला कर भरूनही हक्काचा रस्ता नसल्याने गुरुवारी शेकडो महिलांनी नगर परिषद मुख्यालयात दिवसभर ठिय्या आंदोलन केले.

खोपोली शहराच्या प्रभाग क्रमांक १४ मधील मुकुंद नगरमधील रस्त्याचा प्रश्न गेले २५ वर्षे प्रलंबित होता. हाच रस्त्याचा मुद्दा तापलेला असताना तेथील महिलांनी शुक्रवारी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांचा रस्ता अडविला. त्यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी रस्त्याची मागणी म्हणजे जणू गुन्हाच असल्याच्या अविर्भावात अरेरावी आणि धक्काबुक्कीही केली. यामुळे उडालेल्या गोंधळाच्या वातावरणात पोलिसांनी स्थानिक नगरसेवक आणि वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही न सोडल्याने याबाबतची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली जाणार आहे.

अडीच दशके नगर परिषदेला कर भरूनही हक्काचा रस्ता नसल्याने गुरुवारी शेकडो महिलांनी नगर परिषद मुख्यालयात दिवसभर ठिय्या आंदोलन केले. आज (शुक्रवारी) नगराध्यक्ष सुमन औसरमल, नगरसेवक मोहन औसरमल, राजू गायकवाड, प्रमिला सुर्वे, संदीप पाटील, मुख्याधिकारी गणेश शेट्ये, समाजसेवक राजन सुर्वे नगर परिषदेचा मोठा लवाजमा मुकुंद नगरात आला होता. यावेळी संतप्त महिला-पुरुषांनी त्यांच्याकडे रस्त्याची मागणी केली. यावेळी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी मुख्याधिकारी वाहनातच बसून राहिले असता पोलीस कर्मचारी कृष्णा गडदे यांच्यासह कॉन्स्टेबल किसावे यांनी महिलांंना धमकी देत धक्काबुक्की केलीच, शिवाय तुम्ही युपी, बिहारमधून आलेल्या असून तिकडेच जा, असे शब्द वापरले. इतकेच नाही तर गडदे यांनी नगरसेवकांना देखील पाहुन घेऊ, असे सांगत दमबाजी केली.

- Advertisement -

पोलिसांच्या या उर्मट वर्तनाचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी शुक्ला यांच्याशी संपर्क साधून हकीकत कथन केली असता त्यांनी निरीक्षकांशी बोलतो असे सांगितले. त्यामुळे मुजोरगिरी करणाऱ्याया कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा – Corona Pandemic: महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात कोरोनाचं सर्वाधिक थैमान!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -