घररायगडमोहोपाडा आणि नविन पोसरी येथे आदीवासी बांधवांना खावटी वाटप

मोहोपाडा आणि नविन पोसरी येथे आदीवासी बांधवांना खावटी वाटप

Subscribe

आर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना सहाय्य करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्यावतीने ९ सप्टेंबर, २०२० रोजी खावटी अनुदान योजना मंजुर करण्यात आली होती.

राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता.त्यामुळे आर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना सहाय्य करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्यावतीने ९ सप्टेंबर,२०२० रोजी खावटी अनुदान योजना मंजुर करण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातील वासांबे मोहोपाडा परिसरातील शिवनगरवाडी,शिदींवाडी,मोहोपाडावाडी,खोंडावाडी आदी भागातील १४५ आदीवासी बांधवांना एकात्मिक विकास प्रकल्प पेण यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे खावटी वाटप कार्यक्रम आज (रविवार) २४ रोजी दुपारी चार वाजता मोहोपाडा व नवीन पोसरी येथील रास्त भाव धान्य दुकानाच्या आवारात पार पडला.यावेली नविन पोसरी येथे ३६ तर मोहोपाडा रास्त भाव दुकानावर ११२ खावटी किट वाटप करण्यात आले.याप्रसंगी आदिवासी बांधवांना जवळपास दोन हजार रुपयांचे खावटी किटचे वाटप करण्यात आले.

या खावटी कीटमध्ये मटकी एक किलो,चवली दोन किलो, हरभरा तीन किलो,पांढरा वाटाणा एक किलो, तूरडाळ दोन किलो,मीठ तीन किलो,साखर तीन किलो, गोडेतेल एक लिटर,मिरची पावडर एक किलो,चहापावडर अर्धां किलो आदी वस्तूंचा भरगच्च किट वाटप करण्यात आला.

- Advertisement -

या व्यतिरीक्त प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर २०० हजार रुपये जमा होणार असल्याने लाभार्थ्यांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.वाटपप्रसंगी सरपंच ताई पवार, पुंडलिक पवार, मोहोपाडा रास्तभाव धान्य दुकानाचे अनंता पाटील, नविन पोसरी रास्तभाव धान्य दुकानाचे विनोद पाटील,तसेच एकात्मिक विकास प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.


हेही वाचा – सरकारी कार्यालयात ड्रेसकोडनंतर आता मोबाईल वापरासाठी नवे नियम, जाणून घ्या नियम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -