घरअर्थजगतRBI ने सर्वोदय कमर्शिअल बँकेला ठोठावला १ लाखांचा दंड, खातेदारांना येणार अडचणी?

RBI ने सर्वोदय कमर्शिअल बँकेला ठोठावला १ लाखांचा दंड, खातेदारांना येणार अडचणी?

Subscribe

आरबीआयने दंड ठोठवण्यामागचे कारण काय?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) मार्गदर्शक सुचनांचे पालन न करणाऱ्या अनेक बँकांवर आरबीआयकडून दंडात्मक कारवाई सुरु आहे. यातच सर्वोदय कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँकेलाही (Sarvodaya Commercial Co-operative Bank) आरबीआयने १ लाखांचा दंड ठोठावला आहे. डिरेक्टर्स, नातेवाईक, अनेक कंपन्या , फार्म्सना कर्ज किंवा आगाऊ रक्कम देताना या बँकेने आरबीआयच्या कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यांने हा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयने यावर अशी माहिती दिले की, बँकिंग रेग्यूलेशन कायदा 1949 च्या कलम 46 (4) (i) आणि कलम 56 सह कलम 47 A (1) (C) मधील सुधारणांअंतर्गत सर्वोदय बँकेवर हा दंड ठोठावला आहे. बँकिंग निमयांना बगल देत आर्थिक व्यवहार केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र यामुळे बँक किंवा ग्राहकांमधील कोणत्याही व्यवहारावर, कराराच्या वैध्यतेवर परिणाम होणार नाही.

- Advertisement -

आरबीआयने दंड ठोठवण्यामागचे कारण काय?

३१ मार्च २०१८ रोजी सर्वोदय बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वैधानिक तपासणी केली होती. या तपासणी अहवालात आणि इतर संबंधित अहवालांमध्ये असे आढळून आले की, या बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता व्यवहार केलेत. त्यामुळे बँकेला आता एक लाख रुपयांचा कायदेशीर दंड भरावा लागणार आहे.

या अहवालाच्या आधारे RBI ने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बँकेला पाठवण्यात आली होती. या नोटीसमध्ये बँकेच्या अशा आर्थिक कारभारांमुळे त्यांच्यावर दंड का आकारला जाऊ नये? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. यावर बँकेचे उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीनंतरच्या निकषांच्या आधारे आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. त्यामुळे ही मॉनेटरी पेनल्टी लागू करण्यात आली . यापूर्वी देखील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या चार सहकारी बँकांवर आरबीआयने दंड आकारला होता.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -