घरदेश-विदेशअमरनाथमध्ये ढगफुटी, सिंधु नदीला महापूर, प्रशानकडून हाय अलर्ट

अमरनाथमध्ये ढगफुटी, सिंधु नदीला महापूर, प्रशानकडून हाय अलर्ट

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या पहलगामधील अमरनाथ गुहेजवळ पुन्हा ढगफुटी घटना घडली आहे. आपत्ती निवारण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ढगफुटीमुळे अद्याप कोणत्याही प्रकारची जीवीतहानी किंवा कुणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. कोरोनामुळे सुदैवाने अमरनाथ यात्रा बंद असल्याने मोठी जीवितहानी होता होता टळली आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने ७ नागरिकांचा बळी गेला आहे.

SDRF च्या दोन तुकड्या तैनात 

यात पुन्हा अमरनाथमध्ये ढगफुटी होत जोरदार पाऊसाला सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसामुळे सिंधु नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. याठिकाणी राज्य आपत्ती निवारण दलाच्या (एसडीआरएफ) दोन तुकड्या आधीपासूनच तैनात होत्या. मात्र वाढता धोका पाहता गांदरबलहून एक अतिरिक्त पथकाचा पाचारण करण्यात आले आहे. अमरनाथ गुहा दक्षिण काश्मीरमध्ये ३८८० मीटर उंचीवर आहे.

- Advertisement -

सिंधू नदीने ओलांडली धोक्याची पातळी 

सतत होणारी ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे गंड आणि कंगन परिसरातील सिंधू नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी संभाव्य भीती लक्षात घेता शेजारील गावांना नदीपात्रापासून शक्य तितके दूर राहण्याचे आवाहन केले जात आहे.

- Advertisement -

गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली घटनेची दखल 

या घटनेची देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील दखल घेतली आहे. गृहमंत्री अमित शाह स्वत: या परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर अमित शहा यांनी ट्वीट करत लिहिले की, बाबा अमरनाथ यांच्या पवित्र गुहेजवळ ढगफुटी संदर्भात जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा करुन घटनेची माहिती घेतली आहे. बचाव कार्य आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या रवाना करण्यात येत आहेत”.

किश्तवाडातही ढगफुटी

अमरनाथ गुहेजवळील ढगफुटी आधी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात मोठी ढगफुटीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर किश्तवाडमधील वेगवेगळ्या भागातून ७ मृतदेह सापडेल असून 17 गंभीर जखमी झाले आहे. मात्र अद्याप अनेकजण बेपत्ता आहेत. या जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुसळधार पावसामुळे बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यास अनेक अडचणी येत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -