घरमनोरंजनमैत्रीच्या सुंदर प्रवासावर आधारीत ‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

मैत्रीच्या सुंदर प्रवासावर आधारीत ‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

Subscribe

शांतीत क्रांती ही शांतता आणि कल्याणाचे प्रतीक असून या शोमध्ये सुंदर पद्धतीने ३ मित्रांची मैत्री दाखवली आहे.

उत्तम, विचारप्रवर्तक कन्टेंटसोबत प्रादेशिक घटकांवर भर देत असताना सोनी लिव्हने आपल्या आगामी मराठी ओरिजिनल- ‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर आपल्यासाठी आणला आहे. त्यातून मैत्री, प्रवास आणि स्वतःचा शोध पाहता येईल. ही ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट आहे- श्रेयस, प्रसन्न आणि दिनार. शांतीत क्रांती ही त्यांनी आपल्या आयुष्यातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी ते गोव्याला एका साधी रोड ट्रिपवर जातात आणि यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडतात. त्यांना आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि आयुष्यातील कधीही न अनुभवलेल्या गोष्टी अनुभवण्याची संधी याद्वारे मिळते. शांतीत क्रांती ही शांतता आणि कल्याणाचे प्रतीक असून या शोमध्ये सुंदर पद्धतीने ३ मित्रांची मैत्री दाखवली आहे.

भारतीय डिजिटल पार्टी (भाडिपा) या मराठी साहित्याच्या पेजचे संस्थापक सारंग साठे आणि पॉला मॅकग्लिन यांचे दिग्दर्शन असलेल्या या शोमध्ये लोकप्रिय मराठी कलाकार अभय महाजन (श्रेयस), ललित प्रभाकर (प्रसन्न) आणि आलोक राजवाडे (दिनार) आपल्याला प्रमुख भूमिकेत आहेत . या शोमध्ये लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री शिखा तलसानिया मराठीत प्रथमच दिसणार असून ती प्रमुख भूमिकेत दिसेल. नात्यातील असुरक्षिततेसारख्या समस्या, आयुष्यातील अशाश्वता, अपूर्ण स्वप्ने अशा समस्यांचा सामना करण्यापासून हा शो नवीन दृष्टीकोन आणि शिकवण हलक्याफुलक्या पद्धतीने लोकांसमोर आणतो.

- Advertisement -
ट्रेलर पाहा-

या शोचे दिग्दर्शक सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लिन म्हणाले की, “शांतीत क्रांती हा फक्त शो नाही तर तो आयुष्याचा एक सुंदर अनुभव आहे. हा शो सोनीलिव्ह, आमची क्रिएटिव्ह टीम आणि आमच्या टॅलेंटेड कलाकारांमधील भागीदारीचा परिपाक आहे. त्यामुळे हा शो शक्य झाला आहे. रोड ट्रिप, कथा, निर्माण झालेल्या आठवणी आणि अनुभव हे सर्व नॉस्टॅल्जिया, हास्याचे क्षण आणि आयुष्याला मिळालेले धडे हे घेऊन येतील. ही कथा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आवडेल आणि आम्हाला आशा आहे की, ते नक्कीच या राइडचा आनंद घेऊ शकतील.”

- Advertisement -

हे हि वाचा – ‘बचपन का प्यार’ने उडवली अनुष्का शर्माची झोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -