घरटेक-वेकAlert! २७ सप्टेंबरपासून 'या' स्मार्टफोनमध्ये G-Mail, YouTube सह Google अकाऊंट सपोर्ट करणार...

Alert! २७ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोनमध्ये G-Mail, YouTube सह Google अकाऊंट सपोर्ट करणार नाही!

Subscribe

तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्स आहात का? आणि जर तुमच्याकडेही जुना अँड्रॉइड स्मार्टफोन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी ही खूप महत्वाची आहे. अँड्रॉइड व्हर्जन 2.3.7 किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी गुगल आता सपोर्ट करणं बंद करणार असल्याचे सांगितले जात आहे. गुगल हे सपोर्ट बंद करण्याची प्रक्रिया 27 सप्टेंबर 2021 पासून सुरू करणार आहे. त्यानंतर युजर्सना त्यांच्या फोनमध्ये Google ड्राइव्ह, Google अकाऊंट, Gmail आणि YouTube एक्सेस करता येणार नाही. त्यामुळे युजर्सच्या फोनमध्ये आता अँड्रॉइडची किमान 3.0 Honeycomb हे व्हर्जन असणं आवश्यक आहे. असे असले तरी गूगलने युजर्सना दिलासा दिला असून असे सांगितले की, जुने व्हर्जन असलेले युजर्स ब्राउझरद्वारे त्यांचे जीमेल अकाऊंट एक्सेस करू शकणार आहे.

यासंदर्भात 9to5Google ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. जो Google ने आपल्या युजर्सला पाठवलेल्या ई-मेलचा आहे. अँड्रॉइड व्हर्जन 2.3.7 आणि त्यापेक्षा कमी असलेल्या युजर्सना Gmail मध्ये लॉगिन करताना username किंवा password error चा मॅसेज मिळत असल्याचे सांगितले जात आहे. या मेलमध्ये, युजर्सनना इशारा देखील देण्यात आला आहे आणि त्यांना त्यांचे फोन अपग्रेड करण्यास सांगितले आहे. 27 सप्टेंबर नंतर, अँड्रॉइडचे असे व्हर्जन असलेल्या सर्व युजर्सना जीमेल, यूट्यूब, गुगल मॅप, यूट्यूब या अॅप्लिकेशनमध्ये एरर येत असल्याचे दिसणार आहे.

- Advertisement -

याशिवाय जर एखादा युजर्स त्या फोनमध्ये त्याचे नवीन Google अकाऊंट तयार करेल किंवा नवीन अकाऊंटने लॉग इन करेल किंवा फॅक्टरी रीसेट करेल यावेळी त्याला प्रत्येक बाबतीत एरर मिळेल. या व्यतिरिक्त, जुन्या व्हर्जन असलेल्या युजर्सना Google अकाऊंटचा पासवर्ड बदलताना देखील एरर येईल, असे सांगितले जात आहे.


सोळा कोटीचं इंजेक्शन घेऊनही चिमुरड्या वेदिका शिंदेची मृत्यूशी झुंज अपयशी

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -