घरठाणेचोरट्यांकडून १६ मोबाईलसह लाखोंचा ऐवज हस्तगत

चोरट्यांकडून १६ मोबाईलसह लाखोंचा ऐवज हस्तगत

Subscribe

आरोपी हे बनावट बिल बनवून दुसऱ्या ग्राहकांना विकत होते. अशी माहिती ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली.

ठाणे नगर पोलिसांनी दोन मोबाईल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल सोळा मोबाईल आणि दोन दुचाकी अशा एकूण चार लाख दहा हजाराचा मुद्देमाल  १ जून रोजी हस्तगत केला आहे. आरोपींना न्यायालयाने नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास ठाणे नगर पोलिस करत आहेत.

ठाण्यात गेल्या अनेक दिवसापासून घरफोडी, मोबाईल चोरी, आणि दुचाकी चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. चोरटे दिवसाढवळ्या चोरी करून पळून जात असल्याने पोलीस देखील हैराण होते.
त्यामुळे ठाणे नगर पोलिस ॲक्शन मोडमध्ये येऊन त्यांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. रुपाली शरदचंद्र अकोलकर (४९) या पेशाने वकील असून २२ जुलै २०२१ रोजी दुपारी दिडच्या  सुमारास सिव्हिल हॉस्पिटल येथून जाताना त्या फोनवर बोलत होत्या. त्याचवेळी दोन अज्ञात चोरटे हे दुचाकीवरून आले. त्यांनी  अकोलकर यांच्या हातातील मोबाईल घेऊन उथळसरच्या दिशेने धूम स्टाईलने पोबारा केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला होता. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

या घटनेने ठाणेनगर पोलीस सतर्क झाले. त्यांनी गुन्ह्याचा तपस सुरु केला.  पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे आधार घेत तपास करून खबऱ्या मार्फत माहिती काढून आणि तांत्रिक अभ्यासाच्या आधारावर आरोपी हेमंत शांतीलाल थानीव (२१) आणि आरोपी सागर रामसरोज यादव (२१) दोघेही रा. अशोकनगर, भिवंडी ठाणे असल्याचे समोर आले. पोलीस पथकाने या परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली. अटक आरोपींची कसून चौकशी करून पोलिसांनी नौपाडा, ठाणे नगर, राबोडी परिसरातून केलेल्या मोबाईल चोरीच्या आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यातील १६  मोबाईल आणि दोन दुचाकी हस्तगत केल्या. याची किंमत ४ लाख १० हजार रुपये इतकी आहे. न्यायालयाने आरोपींना नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत. आरोपी हे घरी आपण स्विगी कंपनीमध्ये कुरियर बॉयचे काम करत असल्याचे सांगत होते. मोबाईल चोरल्यानंतर आरोपी हे बनावट बिल बनवून दुसऱ्या ग्राहकांना विकत होते. अशी माहिती ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली.


हेही वाचा – गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा – पनवेल महानगरपालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -