घरदेश-विदेशपेगाससवरुन संसदेत गदारोळ, राज्यसभेच्या अध्यक्षांनी TMC च्या खासदारांना केलं निलंबित

पेगाससवरुन संसदेत गदारोळ, राज्यसभेच्या अध्यक्षांनी TMC च्या खासदारांना केलं निलंबित

Subscribe

राज्यसभेत गदारोळ घालणाऱ्या TMC च्या खासदारांना राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी दिवसभरासाठी निलंबित केलं आहे. पेगासस प्रकरण संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलंच गाजत आहे. पेगासस प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी हे खासदार करत होते. तसंच, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर लक्ष घालावं अशी देखील मागणी करण्यात आली.

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल काही टीएमसी खासदारांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्यापासून निलंबित केलं आहे. टीएमसी सदस्य डोला सेन, अर्पिता घोष आणि नदीम उल हक यांच्यासह विरोधी पक्षांतील काही सदस्यांनी फलक घेऊन राज्यसभेत मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. पेगासस प्रकरणावर चर्चेची मागणी केली आणि सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची तपासणी करावी, अशी मागणी केली.

- Advertisement -

डोला सेन, मोहम्मद नदिमुल हक, अबीर रंजन बिस्वास, शांता छेत्री, अर्पिता घोष आणि मौसम नूर यांना राज्यसभेच्या अध्यक्षांनी सभागृहातील वेलमध्ये प्रवेश करणे, फलक लावणे आणि नियम २५५ अंतर्गत खुर्चीची अपमान केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं आहे. सकाळी ११ वाजता राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यापासून सभागृहाचे कामकाजात अडथळे निर्माण होत होते. त्यानंतर लगेचच विरोधकांच्या घोषणाबाजी दरम्यान नायडू यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब केलं.

नायडूंनी प्रथम सदस्यांना त्यांच्या जागेवर परत जाण्यास सांगितलं. तसंच, फलक लावणाऱ्यांविरुद्ध नियम २५५ लागू करण्याचा इशारा दिला. मात्र, खासदारांनी जाग्यावर बसण्यास नकार दिला. त्यामुळे “खुर्चीचा अपमान करणारे आणि फलक उठवणारे नियम २५५ अंतर्गत सभागृहातून बाहेर जातील, असा आदेश दिला.”

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -