घरताज्या घडामोडीराहुल गांधीनंतर ट्विटरची काँग्रेसच्या डिजिटल चॅनलवर कारवाई, कारण केलं स्पष्ट

राहुल गांधीनंतर ट्विटरची काँग्रेसच्या डिजिटल चॅनलवर कारवाई, कारण केलं स्पष्ट

Subscribe

अकाऊंट लॉग इन करु शकतात मात्र ते ट्विट, रिट्विट, फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करु शकत नाहीत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पिडीतेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते. या भेटीचा फोटो राहुल गांधी यांनी ट्वीट केला होता. राहुल गांधी यांच्या ट्वीटवर आक्षेप घेत ट्विटरनं राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते सस्पेंड केलं होते. यानंतर आता काँग्रेसचे डिजिटल चॅनल आईएनसी टीव्हीचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते सस्पेंड केलं आहे. आईएनसी टीव्हीने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई केली असल्याचे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र काँग्रेसने राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या आरोपाचेही ट्विटरने खंडन केलं आहे.

खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट शनिवारी तात्पुरते लॉक करण्यात आले होते. मात्र माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने या आरोपाचे खंडन केलं आहे. राहुल गांधींचे अकाऊंट सेवेत असल्याचे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर काँग्रेसने राहुल गांधी यांचे अकाउंट तात्पुरते लॉक करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसचे डिजिटल चॅनल आईएनसी टीव्हीचे अकाऊंट नियमांचे उल्लंघन केल्यामुळे लॉक करण्यात आले आहे. सोमवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ट्विटर कार्यालयाच्या समोर राहुल गांधींचे अकाऊंट पुन्हा बहाल करण्यासाठी आंदोलन केलं आहे. कोणाच्या सांगण्यावरुन चुकीच्या पद्धतीने राहुल गांधींचे अकाऊंट लॉक करण्यात आले असा प्रश्न युवक काँग्रेसच्या आंदोलकांनी विचारला आहे.

- Advertisement -

ट्विट करु शकले नाही राहुल गांधी

खासदार राहुल गांधींच्या अकाऊंटवर कारवाई केल्यानंतर काँग्रेसने शनिवारी ट्विट करत सांगितले की, राहुल गांधी यांचे अकाऊंट तात्पुरते लॉक करण्यात आले आहे. अकाऊंट पुन्हा बहाल करण्यासाठी कार्यवाही सुरु आहे. अकाऊंट पुन्हा मिळेपर्यंत ते सोशल मीडियाच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतील तसेच आपले मत मांडत राहतील. असे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते.

ट्विटरकडून प्रतिक्रिया

ट्विटरकडून सांगण्यात आले आहे की, अकाऊंट सस्पेंड करण्यात आल्यावर लोकांना ते अकऊंट दिसत नाही. मात्र काँग्रेसने म्हटलं आहे की, अकाऊंटला तात्पुरते सस्पेंड करण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार राहुल गांधींच्या अकाऊंटरवर अशा प्रकारे कारवाई करण्यात आली आहे की, ते अकाऊंट लॉग इन करु शकतात मात्र ते ट्विट, रिट्विट, फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करु शकत नाहीत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -