घरटेक-वेकभारतात Digital व्यवहार करण्याचा झाला रेकॉर्ड!Google Pay ला मागे टाकत PhonePe अव्वल...

भारतात Digital व्यवहार करण्याचा झाला रेकॉर्ड!Google Pay ला मागे टाकत PhonePe अव्वल स्थानी

Subscribe

देशात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. अद्याप हा कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला नसल्याने त्यासाठी सरकारकडून लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. अशातच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोना दरम्यान, कोणत्याही व्यवहार करताना हा रोख पैशांनी न करता डिजिटल माध्यमातून सर्वाधिक करण्यात आल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, जुलै 2021 चा डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म UPI व्यवहारांची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. या यादीमध्ये, PhonePe हे अॅप भारतातील सर्वाधिक आघाडीचे युनिफाइड पेमेंट इंटरफेस UPI अॅप ​​म्हणून अव्वल स्थानी आले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै 2021 मध्ये फोनपे अॅपद्वारे एकूण 1.4 अब्ज व्यवहार झाले आहेत, ज्याचा एकूण मार्केट शेअर साधारण 46 टक्के आहे. या यादीत गुगल पे मागे पडल्याचे दिसते. फोनपे अॅपवरून जुलै 2021 मध्ये एकूण 2,88,572 कोटी रुपयांचे व्यवहार झाले असल्याचे समोर आले आहे.

Google Pay ला मागे टाकत PhonePe अव्वल

Google Pay ला मागे टाकत PhonePe अव्वल स्थानी असून PhonePe नंतर, Google Pay चा नंबर दुसऱ्या स्थानी येतो. जुलै 2021 च्या आकडेवारीनुसार, Google Pay अॅपवरून 1,119.16 मिलियन म्हणजेच 2,30,874 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. यासह पेटीएम पेमेंट्स बँक अॅपवरून 387.06 दशलक्ष व्यवहार झाले आहेत, जे सुमारे 46,406 कोटी रुपये होते. यादरम्यान, पेटीएम पेमेंट्स बँकेचा मार्केट शेअर 14 टक्के राहिला आहे तर Google Pay चा मार्केट शेअर साधारण 34.35 टक्के असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

डिजिटल व्यवहारांचा झाला रेकॉर्ड

गेल्या महिन्याच्या व्यवहाराच्या तुलनेत जुलै 2021 मध्ये फोनपे वरून होणाऱ्या व्यवहारांची 15 टक्के वाढ झाली आहे. तसेच, Google Pay वरून झालेल्या व्यवहारांत 5 टक्के आणि पेटीएम पेमेंट बँक अॅपमध्ये साधारण 18.50 टक्के वाढ झाली आहे. NPCI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, PhonePe, Google Pay सारख्या थर्ड पार्टी पेमेंट अॅप्सचा एकूण मार्केट शेअर 30 टक्के आहे. जुलै 2021 च्या एकूण UPI व्यवहारांबद्दल सांगायचे झाले तर एकूण UPI व्यवहार साधारण 3,247.82 मिलीयन झाले आहेत, जे पहिल्यांदा 6 लाख कोटींच्या पार गेले आहे.

कोणत्या अॅपचा किती झाला व्यवहार

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -