घरताज्या घडामोडीViral Video: मास्क नसल्यामुळे लावला दंड, तर महिलेने नागरी संरक्षण महिला कर्मचारीला...

Viral Video: मास्क नसल्यामुळे लावला दंड, तर महिलेने नागरी संरक्षण महिला कर्मचारीला केली मारहाण

Subscribe

कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्रिसुत्रीचे पालन करणे खूप गरजेच आहे. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि सतत हात धुणे हे सध्याच्या काळात खूप महत्त्वाचे आहे. पण अशा महामारीचा काळात सुद्धा अनेक जण आपली मनमानी करताना दिसत आहे. दिल्लीत पीरागढी मेट्रो स्टेशन जवळ कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलेला नागरी संरक्षण महिला कर्मचारींनी टोकले म्हणून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए)च्या मार्गदर्शन सूचना आणि आयपीसीच्या इतर कलमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मेट्रो स्टेशनजवळ महिला विना मास्क जात होती. त्यावेळेस महिलेला नागरिक संरक्षण कर्मचारीने तिला टोकले. तर त्यांच्यासोबत भररस्त्यात महिलेने मारहाणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेने आपल्या ओळखीच्या महिलेला घटनास्थळी बोलावले आणि पुन्हा कर्मचाऱ्यांना शिवगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांना दोन्ही महिलांना अटक केली आहे.

या दोन्ही महिलांविरोधात महामारी अॅक्ट आणि आयपीसी कलम १८६, ३५३, ३२३, १८८ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या दिल्लीतील महिलेचा या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -

 

#दिल्ली–#पीरागढ़ी मेट्रो स्टेशन के पास #मास्क न लगाने पर #चालान कर रहे अधिकारीयों के साथ #महिला ने की #मारपीट।

Posted by Pankaj prajapati-journalist on Monday, August 9, 2021

 


हेही वाचा – विदेशी नागरिकाच्या पोटात ७ कोटींचे ड्रग्ज, NCBने केला पर्दाफाश


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -