घरCORONA UPDATEVaccine: भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांना करता येणार CoWin पोर्टलवर लसीसाठी नोंदणी

Vaccine: भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांना करता येणार CoWin पोर्टलवर लसीसाठी नोंदणी

Subscribe

CoWin पोर्टवर लसीसाठी नोंदणी करण्यासाठी विदेशी नागरिक त्यांच्या पासपोर्टचा ID म्हणून वापर करू शकतात.

भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने CoWin पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. (Foreign nationals residing in India can register for the CoWin Portal Vaccine Union Health Ministry say)  सोमवारी भारत सरकारद्वारे आरोग्य मंत्रालयाने भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोरोना विरोधी लस घेण्यासाठी CoWin पोर्टलवर नोंदणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. CoWin पोर्टवर लसीसाठी नोंदणी करण्यासाठी विदेशी नागरिक त्यांच्या पासपोर्टचा ID म्हणून वापर करू शकतात. कोविनवर नोंदणी केल्यानंतर त्यांना लसीकरणासाठी एक स्लॉट मिळेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

कोविन पोर्टलवर लसीसाठी नोंदणी कशी कराल?

  • पहिल्यांदा सरकारच्या www.cowin.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर Register Yourself या बटणावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज समोर येईल.
  • पुढे तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर मोबाईल नंबरवर एक OTP येईल तो तिथे टाइप करा.
  • त्यानंतर रजिस्टर पेज तुमच्या समोर येईल. त्याठिकाणी तुमचा फोटो आयडी टाइप, फोन नंबर, तुमचे संपूर्ण नाव,वय अशी संपूर्ण माहिती भरा.
  • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर SMS द्वारे तुम्हाला कळवण्यात येईल.

    हेही वाचा – Covid 19 विरोधात तयार झालेल्या Antibody इतर variants विरोधात प्रभावी आहेत?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -