घरCORONA UPDATECovid 19 विरोधात तयार झालेल्या Antibody इतर variants विरोधात प्रभावी आहेत?

Covid 19 विरोधात तयार झालेल्या Antibody इतर variants विरोधात प्रभावी आहेत?

Subscribe

नेकांना माहिती नाही की ते कोणत्या वेरिएंटचे शिकार झाले आहेत. त्यामुळे ज्या लोकांसाठी कोरोनाविरोधी लस उपलब्ध आहे त्यांनी लवकरात लवकर लस घेणे महत्त्वाचे

कोरोना  (SARS-CoV-2) व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या अँटीबॉडी इतर वेरिएंटविरोधात प्रभावी ठरतात का? याचे उत्तर देणारा एक अभ्यास समोर आला आहे. फ्रान्सिस क्रिक इंन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हॉस्पिटलच्या NHS फाउंडेशन ट्रस्टच्या टिमने असे म्हटले आहे की, काही वेरिएंटच्या विरोधात एक प्रभावी अँटीबॉडी  ट्रिगर करण्यासाठी सक्षम असू शकते. भविष्यात लसीच्या डिझाइनची माहिती देण्यासाठी याची मदत होऊ शकते. जर्नल ईलाइफमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात तज्ञांनी आधी कोरोना बाधित झालेले आणि ज्यांना महामारीच्या सुरुवातील वेगवेगळ्या कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या रक्ताचे सॅम्पल्स एकत्र केले. त्याचप्रमाणे तिथे काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे सॅम्पल्स आणि रुग्णांचे सॅम्पल्स एकत्र करुन त्याचे विश्लेषण करण्यात आले.

तज्ञांनी त्यांच्या अभ्यासात चीनच्या वुहानमध्ये आढळून आलेला कोरोनाचा मूळ स्ट्रेन, एप्रिल २०२०मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत यूरोपात आढळलेला हावी स्ट्रेन (D613G) आणि दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला बीटा (B1351) स्ट्रेनचा देखील समावेश केला. अभ्यासकर्त्यांना असे आढळले की, अल्फा वेरिएंटला अप्रभावी करण्याच्या तुलनेत अल्फा वेरिएंट विरोधात तयार झालेल्या अँटिबॉडीज मूळ किंवा D614G स्ट्रेनला अप्रभावी करण्यास सक्षम नाहीत. D614 स्ट्रेन संक्रमाणाविरोधात उत्पादित अँटिबॉडीज अल्फा आणि मूळ दोन उपभेदांना D614Gच्या समान स्थरापर्यंत अप्रभावी करण्यास सक्षम आहे. तर अल्फा आणि D614G दोन्ही उपभेदांनी अँटिबॉडीज तयार केल्या ज्या बीटा स्ट्रेनला अप्रभावी करण्यास सक्षम नाही.

- Advertisement -

रोगप्रतिकारक शक्तीचे अनेक घटक आहेत जे एखाद्या व्यक्तीला रोगापासून किती संरक्षण दिले जाऊ शकते हे ठरवते. बी पेशी आणि टी पेशी येणाऱ्या धोक्यांना सामारे जाण्यासाठी आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार करतात.

क्रिक येथील रेट्रोव्हायरल इम्यूनोलॉजी लॅब्रोटरीच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महामारीत मोठ्या संख्येने लोक कोरोना संक्रमित झाले आहे ही बाब लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अनेकांना माहिती नाही की ते कोणत्या वेरिएंटचे शिकार झाले आहेत. त्यामुळे ज्या लोकांसाठी कोरोनाविरोधी लस उपलब्ध आहे त्यांनी लवकरात लवकर लस घेणे महत्त्वाचे आहे कारण कोरोनाविरोधी लस कोरोनाच्या सर्व वेरिएंट विरोधात प्रभावी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Delta Plus Variant: राज्यात वाढतोय डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव; आतापर्यंत ४५ रुग्णांना याची लागण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -