घरठाणेठाण्यात फक्त ठाणेकरांनाच मिळणार लस ; महापालिकेची माहिती

ठाण्यात फक्त ठाणेकरांनाच मिळणार लस ; महापालिकेची माहिती

Subscribe

आधारकार्ड तपासणी करून दिली जाणार लस 

ठाण्यात खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू असते. पण, शासकीय केंद्र आणि रुग्णालयात मात्र लस उपलब्ध होत नसल्याची बाब वारंवार समोर येत आहे. हाच मुद्दा हाती घेत, ठाणे महापालिका स्थायी समिती च्या सदस्यांनी मंगळवारी पार पडलेल्या सभेत ठाणेकरांचे लसीकरण कधी होणार असा सवालही उपस्थित करत, याबाबत तोडगा काढण्यासाठी केवळ ठाणेकरांसाठीच लसीकरण उपलब्ध करुन देण्याचा ठराव करण्याची मागणीही लावून धरली. यावेळी उत्तर देताना, आरोग्य विभागाने  ठाण्यात राहणाऱ्यांच यापुढे मिळणार लस आहे. ही लस देताना त्यावेळी आधारकार्ड बघितले जाणार असून त्या बाबतचा निर्णय अंतिम टप्यात असल्याचेही स्पष्ट केले.

ठामपाच्या स्थायी समिती सभेत  राष्ट्रवादीचे ज्येष्ठनगरसेवक हणमंत जगदाळे यांनी या मुद्याला हात घातला. कोरोनाची तिसरी लाट येत असतांना त्यातून वाचायचे असेल तर लसीकरण महत्वाचे मानले जात आहे. परंतु ठाण्यात आठवडय़ातून एक ते दोन दिवसच लसीकरण मोहीम सुरु असते. सर्वसामान्य ठाणेकरांना लस उपलब्ध होत नाही, त्यांना वणवण फिरावे लागत आहे. असे असतांना खाजगी रुग्णालयात मात्र लसीकरणाचा साठा उपलब्ध आहे. मग महापालिकेलाच लसीकरणाचा साठा का मिळत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यातही लसीकरणावर तोडगा काढण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो प्रयत्न देखील फसला आहे. त्यामुळे आता ठाणेकरांना लस उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व पक्षीयांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, यावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणीही जगदाळे यांनी केली. दुसरीकडे कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी देखील यावर तोडगा काढण्यासाठी केवळ ठाणेकरांसाठीच ठाण्यात लसीकरण सुरु ठेवावे, इतर ठिकाणच्या नागरीकांना ठाण्यात लस देता येऊ नये अशा आशयाचा ठराव करण्याची मागणीही त्यांनी केली. बाहेरचे नागरीक येऊन लस घेऊन जातात, रात्री पासून रांगेत उभ्या असलेल्या नागरीकांना मात्र लस मिळत नसल्याचा आरोप सदस्य मालती पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

दरम्यान दुसरीकडे या संदर्भात आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैयजंती देवगीकर यांनी नवीमुंबईच्या धर्तीवर ठाणेकरांच लस मिळावी या संदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी पत्र दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आता यावर आयुक्तांशी चर्चा करुन त्यानुसार निर्णय घेतला जाईल. हा निर्णय झाल्यास आधारकार्ड बघूनच लस दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भातील निर्णय अंतिम टप्यात असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा – ग्रामीण भागात ५ वी ते ७ वी तर शहरी भागात ८ वी ते १२ वी वर्ग सुरु, शिक्षणमंत्र्यांची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -