घरताज्या घडामोडीनागपंचमीला नागाची पूजा करतात? जाणून घ्या नागपंचमीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

नागपंचमीला नागाची पूजा करतात? जाणून घ्या नागपंचमीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Subscribe

नागपंचमी सणाला हिंदू धर्मात इतके महत्त्व का आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे

श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी (Nagpanchami 2021) साजरी केली जाते. यंदा १३ ऑगस्टला नागपंचमी आली आहे. हिंदू धर्मात नागाला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकरांच्या गळ्याभोवतीही आपल्याला नाग दिसतो. असे मानले जाते की, नाग पंचमीच्या दिवशी सापाची पूजा केल्यास साप चावण्याची भिती आपल्या मनात राहत नाही. ग्रह दोषही दूर होतात अशी समज आहे. नागपंचमी सणाला हिंदू धर्मात इतके महत्त्व का आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे जाणून घ्या नागपंचमीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी. (Worship the snake on Nagpanchami? auspicious moment of Nagpanchami and the pooja ritual )

नागपंचमीचे महत्त्व

- Advertisement -

नागपंचमीचा दिवस कालसर्प योग,गुरुपिडा आणि ग्रहण यापासून मुक्त होण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो, असे म्हणतात की नाग पंचमीला नागाची पूजा केल्याने सर्व दोषातून मुक्ती होते. या दिवशी नागाला दूध पाजल्याने अक्षय पुण्य प्राप्ती होते. या दिवशी घराच्या दोन्ही बाजूला शेणाने नागाचे चित्र काढले जाते. यामुळे सर्पदंशाची भिती कमी होते असे समजले जाते. नागपंचमीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे देखील फायद्याचे मानले जाते. राहु केतूची पिडा सुरू असल्यास त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीचा दिवस शुभ मानले जातो.

नागपंचमीचा शुभ मुहूर्त

- Advertisement -

यंदा १३ ऑगस्ट रोजी नागपंचमी उत्सव आला आहे. सकाळी ५:४९ ते सकाळी ८:२८ पर्यंत नागपंचमीचा मुहूर्त आहे. यंदा नागपंचमीचा मुहूर्त केवळ २ तास ३९ मिनिटांचा आहे. पंचमी तिथीची सुरुवात १२ ऑगस्ट दुपारी ३:२४ पासून सुरू होऊन समाप्ती १३ ऑगस्ट दुपारी १:४२ रोजी होणार आहे.

पूजा विधी

या दिवशी अनेक जण व्रत ठेवतात. त्याचप्रमाणे नागाची पूजा देखील केली जाते. नागपंचमीची पूजा करण्यासाठी नागाचे चित्र किंवा मातीपासून तयार केलेली नागाची मूर्ती चौरंगावर ठेवली जाते. त्यानंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून नागाची पूजा केली जाते. त्यानंतर नागाला कच्चे दूध, घी, साखर एकत्र करुन त्याचा नैवेद्य दाखवला जातो. शेवटी नाग देवतेची आरती करुन नागपंचमीची कथा सांगितली जाते.


हेही वाचा – Shravan 2021: श्रावणात येणारे सण आणि श्रावण महिन्याचे महत्व

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -