राणी मुखर्जी ‘या’ सेलिब्रिटींची झाली शेजारी, मुंबईत खरेदी केलं अलिशान घर

bollywood actress Rani Mukerji buy plush new home in Mumbai worth over Rs 7 crore
राणी मुखर्जी 'या' सेलिब्रिटींची झाली शेजारी, मुंबईत खरेदी केलं अलिशान घर

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) नुकतीच आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात रवाना झाली आहे. आता राणी मुखर्जीबाबत अजून एक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मुंबईतल्या रुस्तमजी पॅरामाउंटमध्ये राणीने एक अलिशान घर खरेदी केले आहे. यामुळे सध्या राणी मुखर्जी चांगलीच चर्चेत आली आहे. रुस्तमजी पॅरामाउंटमध्ये घर खरेदी करणारी राणी मुखर्जी आता ५वी सेलिब्रिटी ठरली आहे. यापूर्वी दिशा पटानी, टायगर श्रॉफ, हार्दिक पांड्या आणि क्रुणाला पांड्यानेपण या बिल्डिंगमध्ये घर खरेदी केले आहे. सध्या या बिल्डिंगमधील घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

माहितीनुसार, राणी मुखर्जीचं हे घर २२व्या मजल्यावर आहे. तिचे हे घर ३,५४५ स्क्वेअर फूट कार्पेटमध्ये तयार झाले असून ४ प्लस ३ बीएचकेचे घर आहे. तिच्या घरातून अरबी समुद्राचे खूप सुंदर दृश्य दिसेल. या घरांमध्ये राणीला दोन कार पार्किंगसाठी जागा मिळाली आहे. राणी मुखर्जीच्या या अलिशान घराची किंमत ७.१२ कोटी इतकी आहे. रुस्तमजी पॅरामाउंटमध्ये आऊटडोअर फिटनेस स्टेशन, आर्टिफिशियल रॉक क्लाइंबिंग एरिया, स्विमिंग पूल, गेमिंग एरिया, मुलांना खेळण्यासाठी जागा, मोठे विश्रामगृह, मिनी थिएटर सारखी सुविधा उपलब्ध आहे. दरम्यान राणी मुखर्जी व्यतिरिक्त काही सेलिब्रिटींनी या बिल्डिंगमध्ये घर खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील बांद्रा येथील खार जवळ रुस्तमजी पॅरामाउंट आहे.

राणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या आगामी चित्रपट ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’च्या शूटिंगसाठी परदेशात गेली आहे. या चित्रपटासाठी जवळपास १ महिन्यापासून ती परदेशात आहे. ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ चित्रपटातील भूमिकेसाठी राणीने खूप तयारी केली आहे. या चित्रपटाची कथा २०११ मध्ये नॉर्वेमध्ये भारतीय वंशाच्या जोडप्याच्या सत्य घटनेवर आधारित आहे.

पाहा रुस्तमजी पॅरामाउंटमध्ये घराचे व्हायरल फोटो