घरCORONA UPDATEMumbai Unlock : मुंबईतील उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी ६ ते रात्री १०...

Mumbai Unlock : मुंबईतील उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत राहणार सुरु

Subscribe

मुंबईसह राज्याला १५ ऑगस्टपासून कोरोना निर्बंधांतून काही प्रमाणात का होईना सुट देण्यात आली आहे. यात लसींच्या दोन डोसनंतर १४ दिवस पूर्ण झालेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा देण्याच आली. तर दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासही मुभा देण्यात आली. यातच मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भातील नवे परिपत्रक मुंबई महानगर पालिकेने जाहीर केले आहे.

गेली अनेक महिने मुंबईतील उद्याने, मैदाने आणि चौपाट्यांवर फिरण्यास नागरिकांना बंदी होती. त्यामुळे फिरण्यासाठी जायचे कुठे अशा प्रश्न मुंबईकरांना पडत होता. मात्र आजपासून नागरिकांना मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील उद्याने, चौपाट्या आणि मैदानांवर मनमोकळेपणाने फिरता येणार आहे. असे असले तरी नागरिकांना कोरोनासंबंधीत नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच पालिका प्रशासनाकडूनही या नियमांचे पालन होतेय की नाही याकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क नसल्यास दंड भरावा लागणार आहे.

- Advertisement -

Indian Idol 12 Winner : पवनदीप कुमारने जिंकली ‘इंडियन आयडल १२’ ची ट्रॉफी


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -