घरताज्या घडामोडीअफगाणिस्तानने वाढवली चिंता, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक

अफगाणिस्तानने वाढवली चिंता, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक

Subscribe

अफगाणिस्तामध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर भारत सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

अफगाणिस्तानमध्ये (afganistan)  तालिबानची (taliban)  सत्ता आल्याने तिथली परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत अफगाणिस्तानमधील सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. (pm modi chairs meeting at PM Modi residence regarding taliban and afganistan)  अफगाणिस्तानात सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे भारताची चिंता वाढली आहे. कारण भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात पारंपारिक व्यापारी संबंध आहेत. त्याचप्रमाणे भारताची अफगाणिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक देखील आहे. अफगाणिस्तामध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर भारत सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात देखील मैत्रिपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये सत्तांतरण झाल्यानंतर भारतासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बोलावण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण उपस्थित होते.

अफगाणिस्तानमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परिस्थितीचा पंतप्रधान मोदी सतत आढावा घेत आहेत. काबुलमध्ये हवाई दलाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर मोदींना कळवण्यात आले होते. काल रात्री देखील ते उशिरा पर्यंत तिथल्या परिस्थितीची माहिती घेत होते. त्याचप्रमाणे जामनगर येथे परतलेल्या नागरिकांसाठी जेवण आणि इतर अत्यावश्यक गोष्टी पुरवण्याचे आदेश देखील मोदींनी दिले होते.

- Advertisement -

काबुलमधील सद्य परिस्थितीची अफगाणिस्तानमध्ये असलेल्या भारतीय दूतावास रुद्रेंद्र टंडन यांनी माहिती दिली. काबुलमधील परिस्थिती अत्यंत भयंकर असून ही परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानवर ताबा मिळवणाऱ्या तालिबान्यांनी भारताला देखील इशारा देखील दिला आहे. भारताने सैनिकी मध्यस्थीचा विचारही करू असे तालिबानने म्हटले आहे.


हेही वाचा – बिथरलेले चेहरे, जगण्याची आशा, अफगाणिस्तानातील भीषणता दाखवणारे विमानातील फोटो

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -