घरताज्या घडामोडीViral Video: 'माझे कपडे फाडले अन् हवेत भिरकावलं'; लाहोरच्या टिकटॉकरवर स्वातंत्र्यदिनी ४००...

Viral Video: ‘माझे कपडे फाडले अन् हवेत भिरकावलं’; लाहोरच्या टिकटॉकरवर स्वातंत्र्यदिनी ४०० जणांचा हल्ला

Subscribe

पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनादिवशी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पाकिस्तानमधल्या लाहोरमध्ये एका महिला टिकटॉकरचे कपडे फाडून मारहाण करून तिला लुटल्याची घटना घडली आहे. यासंदर्भातले व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याप्रकरणी मंगळवारी लाहोर पोलिसांनी ग्रेटर इकबाल पार्कमध्ये एका महिला टिकटॉकर आणि तिच्या साथीदारांना मारहाण केल्यामुळे शेकडो अज्ञात लोकांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डॉनच्या वृत्तानुसार, तक्रारदार आपल्या सहा साथीदारांसोबत स्वातंत्र दिना दिवशी मीनार-ए-पाकिस्तान जवळ व्हिडिओ बनवत होता. त्यावेळेस ३०० ते ४०० जणांनी त्याच्यावर हल्ला केला. पीडितेने आणि तिच्या साथीदारांनी या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केला. परिस्थितीत पाहून पार्कच्या सुरक्षा रक्षकांनी मीनार-ए-पाकिस्तान जवळील गेट खुले केले, असे तक्रारीत म्हटले.

- Advertisement -

दरम्यान पीडितेने दिलेल्या माहितीनुसार एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ‘गर्दी प्रचंड होती आणि कुंपण ओलांडून लोकं आमच्या दिशेने येत होते. लोकं मला धक्के मारत होते. त्यांंनी माझे कपडे फाडले आणि हवेत भिरकावले. तसेच माझी अंगठी, झुमके, मोबाईल आणि ओळखपत्र खेचून घेतले. एवढेच नाहीतर १५ हजार रुपये लुटले. यावेळी काही लोकांनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला. पण खूप गर्दी होती. माझ्या साथीदारांना मारहाण केली. अज्ञात लोकांनी आमच्यावर हिंसक हल्ला केला.’ या घटनेतील असलेल्या सर्व अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा – Kabul Airport: अमेरिकन सी-१७ विमानाच्या चाकांवर आढळले मानवी अवयवाचे तुकडे


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -