घरदेश-विदेशबँकेत चोरी झाल्यास घाबरु नका, खातेधारकांना मिळणार नुकसान भरपाई,RBI ने जाहीर केले...

बँकेत चोरी झाल्यास घाबरु नका, खातेधारकांना मिळणार नुकसान भरपाई,RBI ने जाहीर केले नवे नियम

Subscribe

RBI ने जाहीर केलेले नवे नियम सर्व सरकारी, खाजगी,ग्रामीण, पेमेंट बँक तसेच इतर बँकेला पाळावे लागतील.

आपले पैसे किंवा रोख रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक लोकं आपले पैसे बँकेमध्ये जमा करतात. पण अनेकदा बँकेत चोरी होते. तसेच फ्रॉड किंवा नैसर्गिक संकटामुळे खातेधारकांना विणाकारण नुकसानाचा सामना करावा लागतो. नुकतच आरबीआयने (RBI)  खातेधारकांना होणाऱ्या या नुकसानाबद्दल काही निर्देश जाहीर केले आहेत. या नियमांअतर्गत जर भूकंप,पूर,आणि विज कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची बँकेला त्यांच्या शाखेतील लॉकरची जबाबदारी स्वत: घ्यायला हवी असा नियम RBI तर्फे देण्यात आला आहे. (RBI new rules if there is a theft in bank then bank will have to pay penalty)

एखाद्या शहरातील बँकेत होणाऱ्या चोरी किंवा फ्रॉड, शाखेची इमारत कोसळणे यासारख्या परिस्थितीत जर बँकेच्या लॉकरचे काही नुकसान होत असेल तर त्याची जबाबदारी बँकेवर येणार आहे. तसेच यामुळे जर खातेधारकांचे काही नुकसान झाले असेल तर यासाठी बँक जबाबदार असणार आहे. बँकेला खातेधारकांना होणारे नुकसान भरुन द्यावे लागेल. तसेच ही भरपाई त्या लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या जास्तीत जास्त शंभर पट असेल. म्हणजेच जर लॉकरचे वार्षिक भाडे 10,000 रुपये असेल तर नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त इतर कारणांमुळे लॉकर नष्ट झाल्यास बँकेला त्या खातेधारकाला जास्तीत जास्त 10 लाख रुपये द्यावे लागतील.

- Advertisement -

RBI ने जाहीर केलेले नवे नियम सर्व सरकारी, खाजगी,ग्रामीण, पेमेंट बँक तसेच इतर बँकेला पाळावे लागतील. हे निर्देश बँकांमध्ये सुरक्षित असलेल्या सेफ डिपॉजिट लॉकर्सच्या ऑपरेशनमध्ये एकसमानता आणण्यासाठी आणि त्यांच्यासोबत असलेल्या खातेधारकांचे आणि बँकांचे अधिकार स्पष्ट करण्यासाठी आणण्यात आले आहेत. या नव्या नियमावली अंतर्गत 19 फेब्रुवारी 2021रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचीही दखल घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयने म्हटले आहे की, बँकांना खातेधारकांसोबत लेखी करार करावा लागेल की कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर लेख लॉकरमध्ये ठेवले जाणार नाहीत. जर बँकेला खातेधारकांवर काही शंका असेल तर त्यांना योग्य वाटेल तशी कारवाई करण्याचा अधिकार असेल.


हे हि वाचा – Bank Holiday: बँकेत जाताय मग जरा थांबा, कारण आजपासून बँका ४ दिवस राहणार बंद

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -