घरताज्या घडामोडीऐतिहासिक द्रोणागिरी पर्वतावर जाण्यास पर्यटकांना बंदी

ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वतावर जाण्यास पर्यटकांना बंदी

Subscribe

मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड होऊनही शासकीय अधिकारी आणि स्थानिक पोलीसही हातावर हात ठेवून पहात आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या द्रोणागिरी पर्वताकडे पाठ फिरवलेल्या वनविभागाला आता जाग आली आहे. स्थानिक रहिवाशांनी द्रोणागिरी पर्वताची आणि तिथल्या वनसंपदेची निगा राखूनही या रहिवाशांना पोलीस उपायुक्तांनी पर्वतावर जाण्यास प्रतिबंध केला आहे. विशेष म्हणजे वनविभानेही या निर्णयाचा डोळेझाकून अंमल सुरू केला आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनंतर उरणच्या द्रोणागिरी पर्वतावर जाण्यास रोख लावण्यात आला आहे. द्रोणागिरी डोंगर व परिसर राखीव आहे. या डोंगरावर ऐतिहासिक द्रोणागिरी किल्लाही आहे. या डोंगराच्या पायथ्याशी अत्यत संवेदनशील म्हणून ओळखला जाणारा राष्ट्रीय ओएनजीसी प्रकल्प आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या द्रोणागिरी डोंगर आणि ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या मागील काही वर्षांपासून वाढली आहे. विशेष म्हणजे या पर्वताकडे स्थानिक प्रशासन आणि वनविभागाचेही लक्ष नाही. पोलिसांनी तर केवळ बघ्याची भूमिका घेत या पर्वताला बोडखे केले. मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड होऊनही शासकीय अधिकारी आणि स्थानिक पोलीसही हातावर हात ठेवून पहात आहेत.

या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांनी पर्वताची निगा राखण्यास सुरुवात केली. याच माध्यमातून काही सामाजिक संस्थाकडूनही ट्रेकिंगसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. वाढत्या पर्यटनामुळे पर्वताची डागडुजी होतेच शिवाय ऐतिहासिक किल्ल्याचीही निगा राखली जात आहे. आता मात्र हे ही आता होणार नाही. नवी मुंबई पोलिसांच्या अर्धवटपणाने पर्वतावर जाण्यास निर्बंध घालण्यात आले. वन अधिकार्‍यांनीही पोलिसांच्या या उफराट्या निर्णयाचा अंमल सुरू केला आहे. यामुळे पर्वत आणि पर्वतावरील ऐतिहासिक किल्ला पुन्हा एकदा दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे. याच पर्वताच्या पायथ्यातील मातीचे मोठ्याप्रमाणावर उत्खनन केले जात आहे. याकडे पोलीस, तहसिलदार आणि वनविभाग पध्दतशीर डोळेझाक करत आहे. एकीकडे महाडच्या तळीए गावासारखी परिस्थिती या उत्खननाने द्रोणागिरीची केली आहे. कधीही मातीची दरड कोसळण्याची भीती आहे. मात्र त्याकडे लक्ष देण्याऐवजी निगा राखणार्‍यांचाच मार्ग रोखून पोलीस आणि वन विभागाने स्थानिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लसीचे दोन्ही डोस घेऊनही होतोय डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग; ICMR चा मोठा खुलासा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -