घरपालघरवसई विरार महापालिकेच्या रुग्णालयांचे लोकार्पण; मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी गैरहजर

वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयांचे लोकार्पण; मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी गैरहजर

Subscribe

वसई विरार महापालिकेच्या स्थापनेपासून बहुजन विकास आघाडीचीच महापालिकेत सत्ता होती. मात्र वसई विरार महापालिकेच्या रुग्णालय लोकार्पण सोहळ्याला येथील आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर उपस्थित राहिले नव्हते.

वसई विरार महापालिकेच्या माता व बाल रुग्णालय बोळींज व नालासोपारा जनरल हॉस्पिटल, नालासोपारा (प.) या नवीन रुग्णालयांचा लोकार्पण सोहळा तसेच आचोळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इमारत व बोळींज येथील म्हाडा कॉलनी ते श्रीप्रस्थ शनीमंदीरपर्यंत डी. पी. रस्ता विकसित करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा ऑनलाईन प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्याच्या हस्ते पालघर येथील कार्यक्रमात संपन्न झाला.

बोळींज येथील माता व बाल रुग्णालयात 150 बेडची सुविधा करण्यात आली असून महिला व लहान बालकांसाठी जनरल वॉर्ड, अतिदक्षता विभाग, एनआयसीयूची सुविधा करण्यात आली आहे. रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्याकरता 100 जम्बो सिलिंडर प्रती दिन क्षमतेचा पीएसए ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात 500 लिटर प्रती तास क्षमतेचा आरओ प्लांट तसेच चाळीस हजार लिटर प्रती दिन क्षमतेचा इटीपी ईटीपी बसवण्यात आला आहे.

- Advertisement -

सोपारा जनरल हॉस्पिटल, नालासोपारा (प.) येथे 200 बेडची सुविधा करण्यात आली असून यापैकी 50 आयसीयू बेड व 150 ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आली आहे. तसेच म्यूकोरमायकोसीस रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्याकरिता 200 जम्बो सिलिंडर प्रती दिन क्षमतेचा पीएसए ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात 200 लिटर प्रती तास क्षमतेचा आरओ प्लांट तसेच चाळीस हजार लिटर प्रती दिन क्षमतेचा इटीपी बसवण्यात आला आहे.

आचोळे येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या तळमजला अधिक तीन मजला असलेल्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात येत असून या रुग्णालयात 200 बेडची सुविधा असेल. रुग्णालयात अपघात विभाग, फार्मासी, अलगीकरण कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, प्रसूतीकक्ष, बालकांचे अतिदक्षता विभाग, फ़िजिओथेरेपी, डायलेसिस आदी विविध सुविधा असणार आहेत.

- Advertisement -

स्थानिक लोकप्रतिनिधी गैरहजर

वसई विरार महापालिकेच्या स्थापनेपासून बहुजन विकास आघाडीचीच महापालिकेत सत्ता होती. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात महापालिकेची मुदत संपल्याने प्रशासकीय राजवट सुरु झाली आहे. आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकडेच प्रशासक म्हणून सूत्रे देण्यात आली आहेत. तेव्हापासून प्रशासन आणि बविआमध्ये संघर्ष सुरु आहे. आयुक्त गंगाथरन डी. हे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या मर्जीतील मानले जातात. आमदार हितेंद्र ठाकूरांसह त्यांच्या तीन आमदारांचा राज्यातील महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. पण, शिवसेना अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यात सुप्त संघर्ष सुरु आहे. त्याचे पडसाद महापालिकेच्या कामकाजात पहावयास मिळत आहेत. प्रशासक गंगाथरन डी. बविआला अजिबात जुमानत नाहीत. गंगाथरन यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिले काही महिने तर महापालिकेतील महत्वाची पदे भूषवलेल्या बविआंच्या पदाधिका-यांनाही भेट देत नसत. गंगाथरन यांच्यावर शिवसेनेचाच अंकुश असल्याचे आजही स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे बविआ या कार्यक्रमापासून आपसूकच दूर झाली होती. तसेच पालघर येथील कार्यक्रमातही आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर उपस्थित राहिले नव्हते.

हेही वाचा –

लोकाभिमुख कामे करून नव्या वास्तूला प्रतिष्ठा द्या; मुख्यमंत्र्यांचे अधिकार्‍यांना आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -