घरताज्या घडामोडीएकनाथ शिंदेंनी शिवसेनेत घुसमट होत असल्याचे राणेंना सांगितलं असावं, आशिष शेलार यांचं...

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत घुसमट होत असल्याचे राणेंना सांगितलं असावं, आशिष शेलार यांचं वक्तव्य

Subscribe

काँग्रेसला रोजच लाथाबुक्कांचा मारा सहन करावा लागत आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे महाविकास आघाडीमध्ये केवळ सहीपुरते मंत्री असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलंय, शिंदेंनी भाजपमध्ये यावं असी खुली ऑफर राणेंनी दिली आहे. आता भाजप नेते आशिष शेलार यांनी एकनाथ शिंदेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत घुसमट होत असल्याचे नारायण राणे यांच्या कानात सांगितलं असावं यामुळे यावर मी भाष्य करणार नाही असे सूचक वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे. दरम्यान या सगळ्या वादावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं असून विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरु असल्याचा आरोप केला आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी एकनाथ शिंदेंची शिवसेनेवरील नाराजी यावर सूचक वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला महाविकास आघाडीमध्ये संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार नाही. शहरांचा विकास झाला पाहिजे परंतु सुनियोजितपणा नगर विकास खात्यात नाही आहे. पर्यावरण मंत्रीच सिडको आणि एमएमआरडीएचे निर्णय घेत असल्याचे दिसत आहे. सध्या राज्यात सुपर सीएम पद्धत सुरु झाली असून त्याची आम्हाला चिंता असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

काँग्रेसमध्ये स्वाभिमान नावाचा अवयव उरलाय

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला लाथांचा मारा सहन खावा लागत आहे. मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. याबाबत आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेसची महाविकास आघाडी सरकारमध्ये फार वाईट अवस्था झाली असल्याचे शेलार यांनी म्हटलं आहे. काँग्रेसला रोजच लाथाबुक्कांचा मारा सहन करावा लागत आहे. राष्ट्रवादीकडून मिळेल तेव्हा लाथा मारण्याचे काम सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा काहीही संबंध नाही असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

शिवसेनेत मी समाधानी

नारायण राणे युतीच्या काळात मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनाही माहिती आहे की, धोरणात्मक मोठे निर्णय घ्यायचे असल्यास कोणताही विभाग मुख्यमंत्र्यांचे संमतीने घेतले जातात. राणे आज केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा असेल, पॉलिसी डिसीजन निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संमतीनेच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केलं आहे. ते एकप्रकारचे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अशा प्रकारचे संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राणेंच्या विधानात तथ्य नाही, एकनाथ शिंदेंनी खोडून काढला नारायण राणेंचा दावा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -