घरताज्या घडामोडीनारायण राणेंच्या रडारवर शिवसेनेतील तीन मंत्री

नारायण राणेंच्या रडारवर शिवसेनेतील तीन मंत्री

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेतील तीन मंत्र्यांच्या विरोधातील प्रकरणे उकरून काढणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.  राज्यात कायदा आणि सुव्यवस्था उरलेय कुठे असा सवाल नारायण राणे यांनी केला. दिवसाढवळ्या बलात्कार करून हत्या केल्या जातात. दिशा सालियन प्रकरणाचे काय झाले ? दीशा सालियनची हत्या कोणी केली, कोण मंत्री उपस्थित होता, का अद्याप छडा लागत नाही असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी केला. या सगळ्या प्रकरणात कायदेशीर पद्धतीने पाठपुरावा करत त्या मंत्र्यांना अटक होईपर्यंत थांबणापर नाही असेही ते म्हणाले. बघुयात कोण तुम्हाला वाचवत असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला आव्हान दिले आहे.

राज्यात अनेक महिला आहेत, पूजा चव्हाण आहे. तिच्यावरही तोच प्रकार झाला. त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत आता पाठलाग करणार. लोकशाही मार्गाने हा पाठलाग करणार, कायद्याने पाठपुरावा करणार असेही ते म्हणाले. कोर्टातही त्या केसबद्दल जाणार. त्या प्रकरणाचा पाठपुरावाही करणार आहोत. बघुयात कोण वाचवत ? आम्ही कायदेशीर लढाई लढणार. ज्याने कृत्य केले आहे, ते आत जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असेही राणे म्हणाले. त्यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणांचा पाठपुरावा करणार असल्याचे नारायण यांनी आज स्पष्ट केले.

- Advertisement -

सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक राहिलेल्या दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आले होते. दिशा सालियनच्या हत्येच्या प्रसंगी आदित्य ठाकरे यांची हजेरी होती अशा बातम्या काही प्रसारमाध्यमातून समोर आल्या होत्या. पण त्यानंतर मात्र या संपुर्ण प्रकरणातील नाव मागे पडले. तर दुसरीकडे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर संशयाई सुई आल्यानेच त्यांनाही वनमंत्री पद गमवावे लागले. पण नारायण राणेंच्या अटकेच्या प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या प्रकरणांमध्ये कायदेशीर पाठपुरावा करणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गृहखाते अनिल परबांकडे वर्ग झालेय का ?

अनिल परब बसून पोलिसांना आदेश देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनिल परब गृहमंत्री आहेत का ? असा सवालही त्यांनी केला. अनिल परब तुमच्याकडे गृह खाते आहे का ? असाही सवाल नारायण राणे यांनी यावेळी केला. की गृहखातेही तुम्ही वर्ग केले आहे ? असाही सवाल त्यांनी केला. आता गृहखाते नेमके कोणाकडे आहे हे शोधण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले. बाकी कलेक्शन वगैरे सगळ वर्ग करून घेतले, तसेच गृह खातेही वर्ग केले का ? असाही सवाल राणे यांनी केला. राज्यात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद काहींना पचला नाही. त्यामुळेच आमच्या नेत्यांवर जे केले त्याची दखल घेतली गेली आहे. हे सरकार काही दिवसाचे सरकार आहे असेही ते म्हणाले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -