घरटेक-वेकFree WIFI वापरायचंय तर करा 'या' ट्रीक्सचा वापर; हॅकर्सपासून होणार संरक्षण!

Free WIFI वापरायचंय तर करा ‘या’ ट्रीक्सचा वापर; हॅकर्सपासून होणार संरक्षण!

Subscribe

सध्या डिजिटलायझेनचे युग असल्याने प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि प्रत्येक घरा-घरात वाय-फाय कनेक्शन असल्याचे दिसते. मात्र घराबाहेर पडल्यानंतर देखील काही सार्वजनिक ठिकाणी फ्री वाय-फाय कनेक्शन दिसते. कोणालाही फ्री मिळणार इंटरनेट कनेक्शन, वाय-फाय वापरणं आवडते. पण ते बऱ्याचदा धोकादायकदेखील ठरू शकते. कारण युजर्सच्या या सवयीचा हॅकर्स फायदा घेतात आणि त्यांना त्यांचा बळी बनवताना दिसतात. अशा परिस्थितीत जर फ्री वाय-फाय वापरत असताना हॅकर्सपासून कसे संरक्षण मिळवावे. अशाच काही ट्रीक्स तुम्हाला सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही फ्री वाय-फाय वापरू शकाल आणि हॅकर्स तुमच्यापर्यंत पोहोचू देखील शकणार नाहीत. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या सोप्या ट्रीक्स…

  • फ्री वाय-फाय वापरण्यापूर्वी, मोबाईल सेटिंग पर्यायावर जा. त्यानंतर वाय-फाय वर क्लिक करा.
  • खाली स्क्रोल केल्यानतंर अॅडव्हान्स सेटिंग्ज वर क्लिक करा. येथे तुम्हाला नेहमी उपलब्ध स्कॅनिंगचा पर्याय दिसतील.
  • या फिचरला अॅक्टिव्ह करा.
  • फ्री वाय-फाय नेटवर्कमध्ये काही समस्या असल्यास, हे फीचर स्कॅन करेल आणि तुम्हाला नोटिफिकेशन देईल. अशा प्रकारे तुम्ही हॅकर्सपासून संरक्षित रहाल.

सार्वजनिक, फ्री वाय-फाय वापरणे टाळा

सार्वजनिक आणि फ्री वाय-फाय शक्यतो वापरणं आवर्जून टाळा. कारण हॅकर्स या नेटवर्कद्वारे लोकांना लक्ष्य करण्याची अधिक शक्यता असते. यामुळे ते युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक करू शकतात तसेच बँक खाती रिकामी करू शकतात.

- Advertisement -

VPN चा वापर करा

स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे VPN वापरू शकता. जर एखादा हॅकर आपल्या कनेक्शनच्या मध्ये येत असेल तर येथील डेटा एन्क्रिप्ट केला जातो. बहुतेक हॅकर्स त्यांच्या टार्गेटच्या मागे असल्याने ते चोरलेली माहिती लांब डिक्रिप्शन प्रक्रियेत टाकण्याऐवजी सोडून देताना दिसतात.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -