घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेच्या ताफ्यात ५ इलेक्ट्रिक वाहने

मुंबई महापालिकेच्या ताफ्यात ५ इलेक्ट्रिक वाहने

Subscribe

मुंबई महापालिकेच्या वाहन ताफ्यात सध्या ९६६ वाहने आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल व सीएनजी इंधनावरील वाहनांचा समावेश आहे.

“पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज असून नागरिकांनी दैनंदिन जीवनात पर्यावरण पूरक वाहने व अन्य बाबींचा जास्तीत-जास्त वापर करावा,” असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले आहे. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात इलेक्ट्रिक बसगाड्यांचा (Electric Bus) समावेश काही कालावधीपूर्वी करण्यात आला आहे. आता बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिकेच्या वाहन ताफ्यातही शुक्रवारी ५ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात संवाद साधताना त्यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले.

मुंबई महापालिकेच्या वाहन ताफ्यात सध्या ९६६ वाहने आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल व सीएनजी इंधनावरील वाहनांचा समावेश आहे. आजपासून या वाहन ताफ्यात ५ इलेक्ट्रिक वाहनांची भर पडली आहे. ‘टाटा नेक्सॉन ईव्ही एक्सझेड प्लस’ व्हेहिकल या मॉडेलची ही ५ वाहने आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारितील एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लि. या कंपनीकडून ‘ड्राय-लीज’ पद्धतीने या वाहनांची सवलतीच्या दरात खरेदी करण्यात आली आहे.

- Advertisement -

या वाहनांसाठी दरमहा रुपये २७ हजार इतका खर्च येणार आहे. यामध्ये परिरक्षण व दुरुस्तीचा देखील समावेश आहे. सदर वाहनांमध्ये परंपारिक खनिज तेल वापरण्यात येत असल्यामुळे या वाहनातून हरित वायू, कार्बनडायऑक्साईड इत्यादी प्रतिकूल वायुंचे उत्सर्जन होत नाही. ही वाहने साधारणपणे पुढील ८ वर्षे महापालिकेच्या सेवेत असणार आहेत.


हेही वाचा - गहाळ वस्तू किंवा कागदपत्रांचे प्रमाणपत्र देण्यासाठी यापुढे शपथपत्राची गरज नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -