घरक्रीडाTokyo Paralympics : भारताला धक्का; थाळीफेकपटू विनोद कुमारने 'या' कारणाने कांस्यपदक गमावले

Tokyo Paralympics : भारताला धक्का; थाळीफेकपटू विनोद कुमारने ‘या’ कारणाने कांस्यपदक गमावले

Subscribe

विनोदने कांस्यपदक जिंकताना त्याने आशियाई विक्रमही प्रस्थापित केला होता.

भारताचा थाळीफेकपटू विनोद कुमारने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एफ-५२ थाळीफेक प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. राष्ट्रीय सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेल्या ४१ वर्षीय विनोदने १९.९१ मीटर लांब थाळीफेक करत तिसरा क्रमांक पटकावला. हे कांस्यपदक जिंकताना त्याने आशियाई विक्रमही प्रस्थापित केला होता. मात्र, या कामगिरीनंतर विनोदच्या एफ-५२ थाळीफेक प्रकारासाठीच्या पात्रतेबद्दल अनेक देशांनी आक्षेप घेतला. त्यांनी विनोदच्या अपंगत्व वर्गीकरणाला आव्हान दिले होते. त्यानंतर स्पर्धेच्या पॅनलने याची दखल घेत विनोदला एफ-५२ प्रकारासाठी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे त्याला कांस्यपदक गमवावे लागले आहे.

कामगिरी ग्राह्य धरली जाणार नाही

थाळीफेकच्या एफ-५२ या स्पर्धेत असे स्पर्धक भाग घेऊ शकतात, ज्यांच्या स्नायूंची क्षमता कमी असते, हालचाल मंद असते, हातात आजार असतो किंवा पायाच्या लांबीत फरक असतो. असे खेळाडू बसून स्पर्धा खेळू शकतात. पॅरा-खेळाडूंचे त्यांच्या अपंगत्वानुसार वर्गीकरण केले जाते. विनोदचे २२ ऑगस्टला वर्गीकरण करण्यात आले होते. परंतु, तो या प्रकारासाठी अपात्र असल्याचे टोकियो पॅरालिम्पिकच्या आयोजकांनी पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे पॅरालिम्पिकमधील एफ-५२ थाळीफेक प्रकारात विनोदने केलेली कामगिरी ग्राह्य धरली जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हात नसतानाही उंच कामगिरी, निषाद कुमारला हाय जंपसाठी सिल्वर मेडल


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -