घरमहाराष्ट्रसिंधुदुर्गात गर्भवती महिलांसाठी १ सप्टेंबरपासून विशेष लसीकरण मोहीम

सिंधुदुर्गात गर्भवती महिलांसाठी १ सप्टेंबरपासून विशेष लसीकरण मोहीम

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसात हजार लाभार्थी

राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. १ सप्टेंबर पासून या मोहीमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सद्या जिल्ह्यात सुमारे साडेसात हजार लाभार्थी असून त्यांच्यासाठी कोव्हॅक्सीन लसीचा कोठा राखून ठेवला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गरोदर महिलांनाही कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यास मान्यता मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातही १ सप्टेंबरपासून गरोदर महिलांना कोरोना लस देण्यास सुरुवात होणार आहे. दरमहा ९ तारीखेला तपासणीसाठी येणाऱ्या गरोदर महिलांना लस देण्याचे नियोजन केले आहे, परंतु १० सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने १ सप्टेंबर पासूनच लस दिली जाणार आहे. तर पुढील महिन्यात ९ तारीखला लसीकरणाचे नियोजन केले जाणार आहे.

- Advertisement -

गरोदर महिलांना कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे. त्यामुळे दुसरा डोस २८ दिवसानंतर म्हणजेच लवकर घेता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी कोव्हॅक्सीन लसीचा कोठा राखून ठेवला जाणार आहे. जिल्ह्यात सुमारे ७ हजार ५०० गरोदर महिला लाभार्थी असून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लस देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्ह्यातील गरोदर महिलांनी न घाबरता कोरोना लस घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही जी.प.अध्यक्षा संजना सावंत यांनी केले आहे.


Gold Price Today: ऐन सणासुदीत सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरांतही घसरण


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -